राजश्री शाहू जयंती निमित्त सन्मान सोहळा व वधू वर परिचय मेळावा

राजश्री शाहू जयंती निमित्त सन्मान सोहळा व वधू वर परिचय मेळावा
चिखली -: ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली र. नं. 534/F-11058/2009 द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,सुलोचना महिला आश्रम,लताई अनाथलंय, भोकर ता चिखली च्या वतीने करवीर नरेश आरक्षणाचे जनक राजषी छत्रपती शाहू जी महाराज यांच्या जयंती निमित्त गुणवंतांचा सन्मान सोहळा 2025 चे दि 06 जुलै 2025 रोजी श्री शिवाजी सिनियर कॉलेज चिखली येथे सकाळी ठीक 11. 00 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून सदर कार्यक्रम हा तीन सत्रा मध्ये प्रथम सत्र गुणवंताचा सत्कार यामध्ये इयत्ता 10 व 12 जेइ, नीट, सीईटी या शालांत परीक्षांमध्ये उच्च गुणांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व विविध क्रीडात्मक व यूपीएससी एमपीएससी या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विध्यार्थी सत्कारासाठी आवश्यक गुणांक इयत्ता 10 स्टेट बोर्ड 90% वरती सीबीएससी 85% वरती,इयत्ता 12 स्टेट बोर्ड 90% सीबीएससी 85%, Neet 560 वरती गुण, Jee(main)90%, एमपीएससी यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी, राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती क्रीडा मध्ये सहभागी व विजय विद्यार्थी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका पाठवणे आवश्यक आहे. सदर कार्यक्रम हा चिखली तालुक्या मर्यादित आहे. नाव नोंदणी साठी
तसेच दुसरे सत्र फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला अनुसरून बहुजन समाजातील तळागाळातील सामान्य जनतेला शासन दरबारी न्याय हक्क मिळून देण्यासाठी अविरत संघर्ष करणारे व्यक्तींना बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या स्मृतिप्रित्यार्थ राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार तसेच तिसरे सत्र विवाह इच्छुक बौद्ध समाजातील नव वधू वर परिचय मेळावा सुद्धा संपन्न होणार आहे. या मेळाव्यात डाॅक्टर, ईंजिनीअर, Out Of India सर्व सेक्टर मधली उच्च शिक्षित, सरकारी, निमसरकारी, प्रथम वधु-वर, घटस्फोटीत, विधूर, अपंग, 10 वी 12 वी, सैनिक पाल्य,बौद्ध समाजातील अनेक क्षेत्रातील स्थळे एकच ठिकाणी भेटतील या बौद्ध वधू वर परिचय मेळाव्यास येतांना विवाह इच्छुक वधू वर स्वतः व त्यांचे आई वडील किंवा इतर जवळचे नातेवाईक सोबत असणे आवश्यक असून बायोडाटा व फोटो सोबत आणावे अशी माहिती संस्थेच्या वतीने प्रशांत डोंगरदिवे, एस एस साळवे, सतीश राजे पैठणे यांनी केले आहे.