कत्तली करीता ५८ गोवंशची अवैध वाहतुक नऊ लक्ष त्रेपन हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त ६ आरोपी अटक धारणी पोलीस विभागाची धडक कारवाई
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] महाराष्ट्र मध्यप्रदेश या दोन राज्याच्या सिमेवर वसलेला धारणी तालुका परीणामी मध्यप्रदेशातून महाराष्ट्राच्या मार्गे अधून मधून निरनिराळ्या प्रकारची तस्करी झाल्याचे वेळो वेळी निष्पन्न झाले आहे. अशाच प्रकारची एक मोठी तस्करी गेल्या रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास धारणी विभागाच्या सर्तेकते मुळे उघडकीस आली असून या कारवाईमध्ये धारणी पोलिसांकडून गोवंश तस्करी करणाऱ्यांवर धडक कारवाई करून तब्बल ५८ गोवंश, चार दुचाकी असा जवळपास नऊ लक्ष 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकुण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार मध्यप्रदेशच्या देडतलई येथून गोवंशची एक मोठी खेप अवैधरित्या कत्तली करिता महाराष्ट्रातील धारणी तालुक्याच्या ग्रामीण क्षेत्रातुन अकोट,अकोला येथे नेली जात असल्याची माहीती धारणी पोलीस विभागाला त्यांच्या सूत्रांकडून प्राप्त झाली होती. यालाच अनुसरून अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद , अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली धारणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वात पोलिसांनी झांजरीढाणा येथे धाड मारली असता कत्तली करीता नेण्यात येणाऱ्या एकुण ५८ गोवंश सह सहा इसम आढळून आले. घटनास्थळी उपस्थित लोकांना गोवंशबाबत काही कागदपत्रे किंवा पावती आहे का असे विचारले असता त्यांच्याकडे कोणतीच पावती किंवा कागदपत्रे दिसून आले नाही. यावरून एकूण सहा आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये शेख असलम शेख हसन ३५, अन्सार खान समशेर खान २२, काजीमोद्दीन ईक्रामोद्दीन ३५, मोहम्मद सोहेल मोहम्मद सुलतान ३५, अरबाज खान अयुब खान २४ सर्व राहणार हिवरखेड, अब्दुल शरीफ अब्दुल लतीफ ३६ राहणार धुळघाट रेल्वे यांचा समावेश आहे. सदरच्या कारवाईनंतर मेळघाटातून छुप्या पद्धतीने गोवंश तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वात पीएसआय ईश्वर सोलंकी, पीएसआय रीना सदर, विनोद धर्माळे, जगत तेलगोटे, मोहीत आकाशे, राम सोलंकी, प्रेमानंद गुळदे, गजानन जामनिक, विकास वाकोडे,अनील झारेकर, मिश्रा सह साबुलाल या पथकाने केली असुन सदर प्रकरणाचा पुढील तपास धारणी पोलीस करीत आहे