विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या संदर्भात दिलेल्या निकालाच्या विरोधात चिखली येथे शिवसेना उ.बा.ठा. ने निषेध आंदोलन करण्यात आले. नार्वेकरांना काळी साडी, बांगड्या घालून टरबूजचा नैवेद्य दाखवला.
गेल्या दीड वर्षापासून शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना कोणाची यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटामध्ये न्यायालयीन लढाई सुरू होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सहा महिन्यापासून सदर निकाल देण्यात याव्या या संदर्भात तारीख पे तारीख सुरू होते. परंतु काल नार्वेकर यांनी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे चिन्ह हे सुद्धा एकनाथ शिंदे यांचे असल्याचा निर्णय दिला. त्याच्या निषेधार्थ आज 11 जानेवारी 2024 रोजी चिखली येथे शिवसेना युवासेना तथा किसान सेना यांच्या वतीने नार्वेकर यांच्या प्रतिमेला काळी साडी तथा बांगड्यांचा आहेर देऊन टरबुजाचा नैवेद्य चढवून अनोखे आंदोलन करण्यात आले.
यावेळी विविध घोषणा देऊन सरकारचा तथा नार्वेकर यांचा निषेध करण्यात आला. यावेळी उप जिल्हाप्रमुख कपिल खेडेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे, तालुकाप्रमुख किसन धोंडगे, शहर प्रमुख श्रीराम झोरे, वसंतराव झलटे, विष्णू मुरकुटे, प्रीतम गैची ,विलास सुरडकर, प्रलय खरात, नारायण वाणी, आनंद गैची, रवी पेटकर, समाधान जाधव, शैलेश डोणगावकर, बंडू नेमाने, गजानन पवार, सुनील रगड, दत्ता देशमुख, पवन चिंचोले, राजू भोसले, गजानन साखरे, गजानन वायाळ, प्रवीण सरदड, सुभाष चव्हाण, सागर शेळके, संजय शेळके, सुभाष सोनुने, परमेश्वर सोलंकी, बंटी कपूर, अमर भाकरे, रवी रिंढे, राहुल वर्वांडे, राहुल मोळवंडे, संतोष देशमुख, अरुण सुरडकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.