विशेष बातमी

*हातात हात आणि तो पण घट्ट !*

*हातात हात आणि तो पण घट्ट !*

मित्रांनो, मागील वर्षी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचा जिलाध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली आणि वर्षभरात विविध सामाजिक कार्यक्रम, नाविण्यपूर्ण उपक्रम आणि काही चांगल्या बाबी केल्या. माझ्या टीममधील प्रत्येकाला याचे श्रेय आहे. संग्रामपूरपासून सिंदखेडराजापर्यंत संघटना बांधणी केली. 86 वर्ष जुनी आणि पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी झटत आहे. या संघटनेशी आणि मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्याशी घट्ट नाळ जुळली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात संघटना आणि पत्रकारांची प्रतिष्ठा वाढविण्यात बऱ्यापैकी यश मिळत आहे. समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे पत्रकार आहे…. एस. एम. सरांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मी आणि माझे सर्व सहकारी जिल्ह्यातील पत्रकारांच्या न्याय-हक्क-कल्याणासाठी झटत आहोत… त्याचाच परिपाक म्हणजे बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हा प्रशासनाकडून शासकीय सन्मान झाला. सांगण्यासारखं बरंच आहे पण थोडक्यात हेच की, आज कर्जत येथे परिषदेच्या वतीने आदर्श जिल्हा, तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. मागील वर्षभरात 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संग्रामपूर तालुका पत्रकार संघाला अमरावती विभागातून “आदर्श पत्रकार संघ” पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा समन्वयक मित्रवर्य पंजाबरावजी ठाकरे, संग्रामपूर अध्यक्ष ज्ञानेश्वर दांदडे आणि त्यांच्या सर्व टीमने खूप मेहनत घेतली आहे म्हणून ते अभिनंदनास पात्र आहेत. पुरस्कार वितरण समारंभ सुरु होण्यापूर्वी एस. एम. सरांसह विश्वस्त शरदजी पाबळे, राज्य अध्यक्ष मिलिंदजी आष्टीवकर, सचिव सुरेशजी नाईकवाडे यांची सुंदर भेट झाली. राज्य उपाध्यक्ष चंद्रकांतजी बर्दे, जिल्हा संघाचे सहसचिव शिवाजीराव मामनकर, पत्रकार हल्ला विरोधी समितीचे राजेशजी डिडोळकर, डिजिटल मीडियाचे विभागीय सचिव जितेंद्रजी कायस्थ, जिल्हा सचिव दिपकजी मोरे, शहर संघाचे उपाध्यक्ष सुनिलजी मोरे, कोषाध्यक्ष अजयजी राजगुरे आम्ही सर्व सोबत होतो. बुलढाण्याच्या एकंदरीत कामगिरीवर राज्याचे प्रमुख खुश असल्याचे स्पष्ट होते. आदरणीय एस. एम. सरांनी मला जवळ घेतले.. बाजूला पाबळे सर उभे राहिले आणि दोघांनीही मला मध्यभागी उभे करून माझ्या हातात त्यांचे हात घट्ट धरले…. फोटो काढतांनाच्या औपचारिकता सुज्ञाना सांगण्याची गरज नाही. पण सोबत दिलेला फोटो एकदा निरखून पाहा… यत्किंचितही बनावटपणा कुठेच नव्हता. सर्वांच्या चेहऱ्यावर पारदर्शक आनंदी भाव आहेत…आणि माझ्या चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव आपोआप उमटले होते… एस. एम. सरांनी हातात धरलेला घट्ट हात माझ्यासाठी आशिर्वादच होता….

जय पत्रकार ! जय मराठी पत्रकार परिषद !!

– 🙏🏼*रणजीतसिंग राजपूत*
– अध्यक्ष, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ

◾◾◾◾◾◾◾

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button