विशेष बातमी

*टिव्ही अँड डिजिटल मीडियाच्या जर्नालिस्ट असोसिएशनच्या बुलढाणा तालुका अध्यक्षपदी दिपक मोरे*

*टिव्ही अँड डिजिटल मीडियाच्या जर्नालिस्ट असोसिएशनच्या बुलढाणा तालुका अध्यक्षपदी दिपक मोरे*

*बुलढाणा येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये घेण्यात आला निर्णय*

*बुलढाणापत्रकारांच्या हितासाठी सदैव लढा देणाऱ्या टिव्ही अँड डिजिटल मीडियाच्या जर्नालिस्ट असोसिएशनच्या बुलढाणा तालुकाध्यक्षपदी दीपक मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुलढाणा येथे पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीमध्ये सर्वांमध्ये हा निर्णय घेण्यात आला*

*टिव्ही अँड डिजिटल मीडियाच्या जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलढाणा येथील स्थानिक विश्राम भवनात संघटनेचे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुकाध्यक्ष नियुक्त करण्याचा प्रस्ताव संघटनेचे जिल्हाध्यक्ष फहीम देशमुख यांनी मांडल्यानंतर सर्वांनी या विषयाला तात्काळ मान्यता दिली. त्यानंतर बुलढाणा येथून या विषयाची सुरुवात करण्यात आली यामध्ये बुलढाणा येथील पत्रकार दीपक मोरे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाले. यानंतर जिल्हाध्यक्ष फहीम देशमुख यांनी त्यांना तालुकाध्यक्ष म्हणून घोषित केले. यावेळी मोरे यांचा सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागता सत्कार करण्यात आले. संघटनेला बळकटी येण्यासाठी विविध उपक्रम आणि उपाययोजना करून पत्रकारांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यासाठी आपण सदैव लढा देणार असल्याची ग्वाही यावेळी नवनियुक्त तालुकाध्यक्ष दीपक मोरे यांनी दिली.*
*या बैठकीला संस्थापक अध्यक्ष राहुल पहूरकर, जिल्हाध्यक्ष फहीम देशमुख, ज्येष्ठ सन्माननीय सदस्य संजय जाधव,युवराज वाघ,संदीप शुक्ला, माजी जिल्हाध्यक्ष अमोल गावंडे, वसीम शेख,प्रफुल खंडारे, संदीप वानखडे, दिपक मोरे, किशोर खंडारे, निलेश राऊत, संतोष करे आदींची यावेळी उपस्थिती होती. बैठकीचे संचालन संघटनेचे सचिव प्रफुल्ल खंडारे यांनी तर आभार अमोल गावंडे यांनी मानले.*

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button