बातमी
बाप से बेटा सवाई’… क्षृगल शेळकेच्या (शिवबा) शॉर्ट फिल्मला चार पुरस्कार..

बाप से बेटा सवाई’… क्षृगल शेळकेच्या (शिवबा) शॉर्ट फिल्मला चार पुरस्कार..
बुलढाणा
लेखक-दिग्दर्शक क्षृगल शेळके उर्फ शिवबाने आपल्या कर्तृत्वाने जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. त्याच्या ‘रिवायत’ या शॉर्ट फिल्मला तब्बल चार पुरस्कार मिळाले आहेत. शिवबाचे वडील सुनील शेळके हे प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शिवबाने घेतलेली उत्तुंग भरारी ‘बाप से बेटा सवाई’ या उक्तीचा प्रत्यय देणारी आहे. चार पुरस्कार आणि एका राष्ट्रीय स्तरावरील अधिकृत निवडीचा बहुमान मिळवणारी ‘रिवायत’ ही शॉर्ट फिल्म आता युट्यूब वर प्रदर्शित झाली आहे. लेखक-दिग्दर्शक क्षृगल शेळके आणि संपूर्ण टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



