बातमी

दुष्काळग्रस्त ३५ कुटुंबांना किराणा किटचे वाटप कस्तुराई बहुउद्देशीय संस्थेसह महिला पतंजलीचा सामाजिक उपक्रम; लोकवर्गणीतून ४५ हजारांची मदत

 

दुष्काळग्रस्त ३५ कुटुंबांना किराणा किटचे वाटप
कस्तुराई बहुउद्देशीय संस्थेसह महिला पतंजलीचा सामाजिक उपक्रम; लोकवर्गणीतून ४५ हजारांची मदत

प्रतिनिधी | शेगाव
दुष्काळग्रस्त परिस्थितीत आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गरजू कुटुंबांना मदतीचा हात देत शेगाव येथील योग साधिकांनी सामाजिक बांधिलकी जपली. सेवाभाव हाच खरा योग आणि माणुसकी हाच खरा धर्म या भावनेतून कस्तुराई बहुउद्देशीय संस्था, शेगाव, युवा विकास बहुउद्देशीय संस्था, अमरावती आणि महिला पतंजली तहसील शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन अनावश्यक खर्चाला फाटा देत कस्तुराई फाउंडेशन व महिला पतंजलीच्या शेगाव येथील अध्यक्षा कालिंदी असंबे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेगाव मधील नागरिक, तहसीलदार प्रज्ञा काकडे, जिगाव प्रकल्पाच्या सीईओ कल्याणी यमाजी, महिला पतंजलीच्या सदस्या तसेच युवा विकास संस्थेचे अध्यक्ष गोपाल जवळकर यांनी योगदान दिले. यातून तब्बल ४५ हजार रुपयांची लोकवर्गणी जमा झाली. या निधीतून ३१ ऑक्टोबर रोजी शेगाव तालुक्यातील जळंब येथे ३५ गरजू कुटुंबांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये किमतीचे किराणा किट वितरित करण्यात आले. महिलांनी पुढाकार घेत राबविलेल्या या उपक्रमातून गरजू कुटुंबांना दैनंदिन गरजांसाठी आधार मिळाला.
या सेवाकार्यात श्रीकृष्ण असंबे, रामहरी निकम, ज्ञानू दुटे, प्रभुदास देवचे, अर्चना जोशी, सुनीता भिसे, सुनीता काकड, संगीता पाटील, रश्मी संघानी यांच्यासह अनेक योगसाधिकांनी सहकार्य केले. छोट्याशा मदतीतूनही गरजूंच्या जीवनात मोठा आधार निर्माण होऊ शकतो, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button