बातमी

शिक्षकांनो प्रा. लहाने सरांच्या पाठीशी उभे रहा…* *अभिवाचन देतो “जुनी पेन्शन” लागू करू… उद्धव ठाकरेंची शिक्षकांना साद!*

*शिक्षकांनो प्रा. लहाने सरांच्या पाठीशी उभे रहा…*

*अभिवाचन देतो “जुनी पेन्शन” लागू करू… उद्धव ठाकरेंची शिक्षकांना साद!*

*मुंबई*

*राज्याचा मुख्यमंत्री असताना मी शेतकऱ्यांना आंदोलन न* *करता,कर्जमुक्त केले.शिक्षकांच्या प्रलंबित पेन्शनच्या प्रश्नावर तर मी जुनी पेंशन लागू करण्याचे तेव्हाच*
*लेखी मान्य केले होते.* *दिल्या शब्दासाठी जगणे आणि जागणे हा वंदनीय शिवसेनाप्रमुखांचा संस्कार आहे. तसा मी आणि माझी शिवसेना आजवर वागत आली* *आहे.शिवसेना पक्षाच्या वतीने दत्तात्रय लहाने यांच्यासारख्या प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्त्यास अमरावती शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी दिली आहे.*
*त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा,”जुन्या पेन्शन” तसेच नैसर्गिक वाढी नुसार टप्पा अनुदानासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.* *शिक्षकांसाठी भावनिक पत्रच त्यांनी आज जारी केले.*

अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघासाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी शिक्षकांना आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की,
आपण शिक्षक सुज्ञ आणि सुजाण नागरिक घडविणारे मूर्तिकार आहात.आपल्या विद्यार्थ्याने निव्वळ शिक्षणात प्रगती
करून थांबू नये तर तो एक जबाबदार नागरिक घडला पाहिजे असे प्रत्येक शिक्षकाला वाटत असते. असे विद्यार्थी
घडविणारे शिक्षक हे समाजाचे ही आदर्श असतात. अशा आदर्श शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक
आदर्श उमेदवार हवा आणि नेमका तो उमेदवार म्हणजे दत्तात्रय लहाने होय.

*शब्दाला जागणे हा आमचा संस्कार*

आज शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, जे यापूर्वी निवडून गेले किवा निवडून दिले त्यांनी काय दिवे लावलेत हे मी सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असताना मी शेतकऱ्यांना, त्यानी आंदोलन वा
मागणी न करता, कर्जमुक्त केले होते. आपल्या प्रलंबित पेन्शनच्या प्रश्नावर तर मी जुनी पेंशन व नैसर्गिक वाढी नुसार टप्पा अनुदान लागू करण्याचे लेखी मान्य केले होते. दिल्या शब्दाला जगणे आणि जागणे हा वंदनीय शिवसेनाप्रमुखांचा संस्कार ! आणि तसा मी आणि माझी शिवसेना आजवर वागत आली आहे. दुर्दैवाने काही आमदार गद्दारी करून सोडून गेल्याने, खरे तर विकले गेल्याने मला जुन्या पेन्शनची वचनपूर्ती करता आलेली
नाही. पण म्हणून, मी आणि माझी शिवसेना स्वस्थ बसणार नाही. दिल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठीच दत्तात्रय
लहाने याना उमेदवारी दिली आहे.

*लहाने यांच्या शपथपत्राचे कौतुक!*

लहाने यांनी तहसीलदारांसमक्ष स्वाक्षरी करून एक लेखी वचन दिले आहे की जो पर्यंत शिक्षकांना
जुनी पेंशन व नैसर्गिक वाढी नुसार टप्पा अनुदान लागू होत नाही तो पर्यंत ते आमदार म्हणून मिळणारे वेतन स्वीकारणार नाहीत. आजवर असा वचनबद्ध
आणि समर्पित भावनेने काम करणारा उमेदवार माझ्या तरी नजरेस आलेला नाही. त्यांचे सामाजिक कार्यही उल्लेखनीय
आहे.असे सांगून शिक्षण सम्राटांच्या या लढाईत आणि बाजारात समाजाची मूल्य वाहून जाता कामा नये असे त्यांनी म्हटले आहे.एक प्रामाणिक आणि वचनबद्ध उमेदवार दत्तात्रय लहाने यांना १ क्रमाकांचे मत देवून भरघोस मतांनी विजयी करा ते तुमचा आवाज विधान परिषदेत बुलंद करातील असे अभिवचनच ठाकरे यांनी शिक्षकांना दिले आहे. ठाकरेंची भावनिक साद आणि जुन्या पेन्शनचा ठाम आग्रह,त्यासाठी लेखी हमीपत्र याचा मोठा परिणाम शिक्षक वर्गावर झाल्याचे दिसत आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button