बातमी

ठाकरे शिवसेना विरुद्ध शिंदेंसेना; खरी लढत दोन्ही शिवसेनेतच?* *​जिल्ह्याची अस्मिता ठरणार “डी.एस.” सर!* ​

*​ठाकरे शिवसेना विरुद्ध शिंदेंसेना; खरी लढत दोन्ही शिवसेनेतच?*

*​जिल्ह्याची अस्मिता ठरणार “डी.एस.” सर!*

​
अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची धामधूम ऐन रंगात आली असून, या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात या वेळी सर्वाधिक मते आहेत. दहा हजार मते असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात तब्बल नऊ उमेदवार उभे असल्याने मतविभाजन अटळ मानले जात आहे; तर त्यापाठोपाठ नऊ हजारांवर मते असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात दोनच प्रबळ उमेदवार रिंगणात असल्याने येथे स्थानिक अस्मिता आणि नेतृत्वाच्या मुद्द्याने जोर धरला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्हा या निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरण्याची चिन्हे आहेत.
​या निवडणुकीत मुख्य तिरंगी लढत होत असून, त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रा. दत्तात्रय लहाने, शिंदेसेनेचे किरण सरनाईक आणि काँग्रेसच्या आदिती पोहरे यांच्यात मुख्य सामना रंगताना दिसत आहे.

✍️*Ganeshnikam*

​मुख्य मुद्दे एका नजरेत:

*१)​अमरावती:मतविभाजनामुळे अनिश्चितता.*

*२)​बुलढाणा जिल्हा: निर्णायक भूमिका आणि थेट लढत.*

*​३)प्रमुख तीन उमेदवार:*

*प्रा. दत्तात्रय लहाने (ठाकरे सेना), किरण सरनाईक (शिंदे सेना), आदिती पोहरे (काँग्रेस)*

*​शिक्षकांना बोचतोय ‘पैठणीचा डाग’*

​मागील निवडणुकीतील पैठणीवाटपाचा वाद आणि त्यावरून झालेली टीका किरण सरनाईक यांच्यापुढील आव्हाने वाढवणारी ठरत आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, टप्पा अनुदान आणि जुनी पेन्शन यांसारखे प्रश्न अजूनही कायम असल्याने सरनाईक यांच्यासाठी ही निवडणूक सोपी राहिलेली नाही.

*​सरंजामी आदेश शिक्षक पाळणार का?*

​काँग्रेसने ऐन वेळी दिलेला उमेदवार कितपत स्वीकारला जाईल, हा मोठा कळीचा मुद्दा आहे. आदिती पोहरे यांच्याकडे केवळ वडिलांची (हर्षवर्धन देशमुख) पुण्याई असली, तरी सामाजिक कार्याचा अभाव आणि प्रकाश पोहरे यांची नोकरदार वर्गाविषयी राहिलेली आक्रमक भूमिका यामुळे नवख्या आदिती पोहरे यांच्यासाठी हा डोंगर सर करणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.

*प्रा. लहाने का आहेत ‘सेफ’?*

​इतर उमेदवारांच्या तुलनेत बुलढाण्याचे प्रा. दत्तात्रय लहाने बरेच ‘सेफ’ मानले जात आहेत. बुलढाण्यातील बक्कळ मतदान, त्यांचे तळागाळातील सामाजिक कार्य, विधवा परिषदेच्या माध्यमातून दिलेले योगदान आणि शैक्षणिक क्षेत्रातील आदरयुक्त स्थान यामुळे बुलढाणा जिल्हा त्यांच्या पाठीशी एकवटण्याची शक्यता आहे.

*​शिक्षकांच्या मनातील बोलताहेत उद्धव ठाकरे!*

​मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय आणि नुकतेच जुनी पेन्शन व टप्पा अनुदानावर जाहीर केलेले पत्रक यामुळे शिक्षक वर्गात उद्धव ठाकरे यांच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे. ठाकरे यांनी प्रा. लहाने यांच्यासाठी घातलेली भावनिक साद आणि जुनी पेन्शन लागू करण्याच्या वचनामुळे लहाने यांच्या विजयाचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button