देऊळगाव साखरशाला पाणीटंचाईचे चटके, विहीरींनी गाठला तळ, जनावरांची पाण्यासाठी वणवण !
मागासवर्गीय वस्तीची तहानही एकाच हात पंपावर, गावकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन!

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा गावाला आताच पाणी टंचाईचे चटके जाणवत असून, जनावरांची पाण्यासाठ वणवण होत आहे. येथील मागासवर्गीय वस्तीची तहान एकाच हातपंपावर आहे. तरी येथील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी गावकऱ्यांनी तालुका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे १५ आक्टोबर रोजी केली आहे.
याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनकरराव खरात यांना १५ आक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अल निनो च्या प्रभावामुळे यावर्षी पावसाळा कमी झाल्याने सगळीकडे पाणीटंचाई जाणवत आहे.तालुक्यातील देऊळगाव साखरशा गावालाही पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. गावातील विहिरींनी तळ गाठला असून, मागासवर्गीय वस्तीची तहानही सध्या एकाच हात पंपावर भागवावी लागत असून सदर हात पंपाची पाणी पातळी देखील खोल गेली आहे. जनावरांची पाण्यासाठी वणवण होत असून त्यासाठी उतावळी धरणातील पाणी नदीत सोडावे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून येथील उतावळी प्रकल्पावर सात गाव पाणीपुरवठा योजनेचे काम केले असले तरी सदर योजना अद्याप कार्यान्वित नाही .सदर योजनेमध्ये देऊळगाव साखरशा गावाचा देखील समावेश आहे. तरी याबाबत तातडीने उपाययोजना करून गावातील पाणी टंचाई दूर करत गावकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी देखील मागणी करण्यात आली आहे . युवा सेना तालुकाप्रमुख संदीप अल्हाट, ज्येष्ठ पत्रकार बाळू वानखडे, शे.अबरार , प्रेमचंद नहार यांनी सदर निवेदन दिले. निवेदनावर जेष्ठ पत्रकार प्रमोद देशमुख, शे.अलीम शे.ईस्माईल, शेख सरफराज शे. सत्तार, विठ्ठल गायकवाड, उस्मान बेग मिर्झा, सोहेल खान अयुब खान, अमरशेठ बेगाणी, जनार्दन तोंडे, पन्नालाल बेगाणी, उमेश वानखडे, विकास वानखडे, अर्चना वानखडे, स्मिता वानखडे, आनंद वानखडे, संजय खंडारे ,गजानन पाचपोर, दिलीप पांडुरंग वानखडे, सुपाजी वानखडे, अनिल वानखडे, विनोद वानखडे, अष्टगाथा वानखडे, कपिल वानखडे, मुनसीब खान, सदानंद वानखडे, मिलींद वानखडे दीपक वानखडे यांचेसह असंख्य गावकऱ्यांच्या सह्या आहेत. सदर निवेदनाची प्रत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार सिद्धार्थ खरात ,तहसीलदार निलेश मडके यांना देखील देण्यात आली आहे.



