Uncategorized

*सौ उज्वला निवृत्ती जाधव यांना बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार* मो जे केळवद वार्ता

*सौ उज्वला निवृत्ती जाधव यांना बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार*
मो जे केळवद वार्ता

केळवद येथील रहिवाशी असलेल्या सौ उज्वला निवृत्ती जाधव मु पो केळवद ता चिखली जि बुलढाणा गेल्या 15 वर्षांपासून शेती करतात आधुनिक शेती व शेतीपूर्क व्यवसाय जसे की मधमाशी पालन, शेळीपालन , मत्स्यव्यवसाय , कुकुटपालन, कांदा चाळ, पॅक हाऊस, सिताफळ लागवड पेरू लागवड , बांबू लागवड, विहीर पुनर्भरण सोलर झटका मशीन इत्यादी असून त्यांना आज 26/09/2026 रोजी बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सहकुटुंब सहपरिवार त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री जालिंधर बुधवत
सभापती, सर्व संचालक मंडळ, अधिकारी,कर्मचारी आणि सन्माननीय शेतकरी बांधव, व्यापारी व हमाल-मापारी बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.या आमसभेत बाजार समितीच्या गेल्या वर्षातील कामांचा आढावा घेण्यात आला, तसेच पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आणि शेतकरी हिताचे विविध महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
आमसभेतील मुख्य मुद्दे:शेतकरी हित सर्वप्रथम: शेतकऱ्यांच्या शेतीमालाल योग्य भाव मिळवून देणे आणि बाजार आवारात आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर शेतकरी, व्यापारी आणि सर्व घटकांच्या समन्वयातून बाजार समितीला प्रगतीपथावर नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.बाजार समितीच्या प्रगतीमध्ये सातत्याने सहकार्य करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे, व्यापाऱ्यांचे आणि हितचिंतकांचे सभापती यांनी मनःपूर्वक आभार मानले!
यावेळी शेतीनिष्ठ आणि विविध कृषी पुरस्कार मिळालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार देखील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आला. नितीन खुरद, प्रफुल्ल सुलताने, समाधान गावंडे, विठ्ठल धुळे, सुनील अंभोरे, चंद्रकला सुरुशे, मोहनसिंग राजपूत, अवचितराव पालकर, उज्वला जाधव या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा बाजार समितीच्या वतीने सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपसभापती शेषराव कानडजे,संचालक तुळशीराम काळे,नंदूभाऊ शिंदे,ओम सिंग राजपूत,सुनील सोनवणे, लखन गाडेकर,माणिकराव खांडवे, कल्याणराव कानडजे,संजय दर्डा,हरी सिनकर,सुनील तायडे,प्रशांत गाढवे, संचालक मंडळ तसेच शेतकरी उपस्थित होते!

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button