राजकीय बातमी

हम… आपके साथ.. है,  राहुल गांधींचा राहुल बोंद्रेना फोन वरून संवाद * राहुल बोंद्रेंचा होणारा भाजप प्रवेश रद्द!

हम… आपके साथ.. है, 

राहुल गांधींचा राहुल बोंद्रेना फोन वरून संवाद

* राहुल बोंद्रेंचा होणारा भाजप प्रवेश रद्द!

चिखली
      काँग्रेसचे माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश आज 22 सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणार होता. परंतु रात्रीच राहुल बोंद्रे यांना लोकसभेचे विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांनी राहुल बोंद्रे यांच्याशी मोबाईल वरून संवाद साधला. हम आपके साथ है….. ऐसी गलती मत करना… असा भावनिक संवाद साधल्यामुळे अखेर बोंद्रेंचा होणारा भाजपा प्रवेश रद्द झाला आहे.
         राहुल बोंद्रे यांनी यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार मुंबई येथे आज दुपारी भाजप प्रवेशाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तसेच चिखली मतदारसंघाच्या विकास कन्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होता. काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राहुल बोंद्रे यांच्याशी थेट फोनवरून संवाद साधला.
        या संवादानंतर राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसमध्येच राहून पक्षासाठी काम करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. राहुल गांधी यांनी बोंद्रे यांच्याशी संवाद साधत पक्ष सोडू नये, अशी भूमिका व्यक्त केल्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली असून, २२ सप्टेंबरला होणारा बहुचर्चित भाजप प्रवेश आता रद्द झाला आहे. राहुल बोंद्रे यांच्या निर्णयामुळे चिखलीसह बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबत पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राहुल बोंद्रे यांनी राहुल गांधी यांच्याशी झालेल्या संवादानंतर काँग्रेससोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button