बातमी

देवकर यांच्या रूपाने संधी, शिक्षकांचा ठाम निर्धार! 

* शिक्षक संघटनेचा प्रतिनिधीच विधानसभेत हवा : ‘शिक्षक भारती’ला अभूतपूर्व प्रतिसाद 

देवकर यांच्या रूपाने संधी, शिक्षकांचा ठाम निर्धार! 

* शिक्षक संघटनेचा प्रतिनिधीच विधानसभेत हवा : ‘शिक्षक भारती’ला अभूतपूर्व प्रतिसाद 
बुलढाणा 
         अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक आता केवळ एक निवडणूक राहिलेली नसून, सुशिक्षित मतदारांनी व्यवस्थेविरुद्ध आणि हक्कासाठी पुकारलेला लढा बनली आहे. राजकीय पक्षांनी या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली असली, तरी अमरावती विभागातील शिक्षकांनी यंदा आधीच आपला निर्णय पक्का केल्याचे दिसत आहे. ‘शिक्षक संघटनेचा प्रतिनिधीच विधानसभेत हवा,’ या भूमिकेवर ठाम राहत मतदारांनी यंदा शिक्षक भारती संघटनेचे सुरेश देवकर यांच्या पारड्यात आपले वजन टाकल्याचे पाहायला मिळत आहे.
        अमरावती शिक्षक मतदार संघाचा इतिहास पाहिला तर, आजवर राजकीय पक्षांनी इथे आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला, पण जागरूक मतदारांनी त्यांना वेळोवेळी झिडकारले आहे. राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी एकेकाळी पराभवाचा दणका दिल्याची नोंद आहे. १९८३ मध्ये जेव्हा हा मतदार संघ अस्तित्वात आला त्याकाळी हा भाग नागपूर मतदार संघ म्हणून ओळखला जात होता, तेव्हा १९८४ च्या पहिल्याच निवडणुकीत शिक्षकांनी शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधीला आपला पहिला आमदार म्हणून विधिमंडळात पाठवले होते. त्याबरोबरच मागची निवडणूक बघितली तर २०१४ ते २०२६ या एक तपाच्या काळात अपक्ष उमेदवारांना पसंती मिळाली असली, तरी आता पुन्हा एकदा नेतृत्वाची धुरा अस्सल शिक्षक संघटनेकडेच सोपवण्याची तीव्र इच्छा शिक्षकांमध्ये दिसून येत आहे. राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपाबद्दल शिक्षक वर्गात असलेला हाच रोष निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.
* शिक्षकांच्या जाणीवांना स्पर्श करणारा वचननामा 
        शिक्षक भारती संघटनेचे सुरेश देवकर हे प्रचारात सर्वात आघाडीवर असून त्यांच्या बाजूने जोरदार हवा तयार झाली आहे. त्यांच्याविषयी अमरावती विभागात अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांनी जाहीर केलेला सर्वसमावेशक जाहीरनामा केवळ आश्वासनांचा नसून, तो शिक्षकांच्या खऱ्या जाणीवांना आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नांना स्पर्श करणारा ठरला आहे.
* बी. टी. देशमुख यांचा वैचारीक वारसा.. 
           ज्येष्ठ नेते बी. टी. देशमुख यांनी ज्या आक्रमक आणि धोरणी बाण्याने शिक्षकांच्या हक्कासाठी लढा दिला होता, अगदी तसेच माजी आमदार, शिक्षक भारतीचे कपिल पाटील आणि सुरेश देवकर सर अनेक वर्षांपासून शिक्षकांचे प्रश्न मांडत आहेत. देवकर सर देशमुख यांचा वैचारिक वारसा जोपासणारे ठरले आहेत. शिक्षकांच्या मनातील नेतृत्व म्हणून आता सुरेश देवकर यांच्याकडे पाहिले जात आहे. शिक्षक यंदा आपल्या हक्काचा माणूस म्हणून देवकर सरांना विधानसभेत
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button