आरोग्य बातमीबातमी

धनत्रयोदशीला प्रत्येक घरात धन्वंतरी देवतेची पूजा करा : केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांचे नागरिकांना आवाहन

 

धनत्रयोदशीला प्रत्येक घरात धन्वंतरी देवतेची पूजा करा : केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांचे नागरिकांना आवाहन

बुलढाणा (प्रतिनिधि ) धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. दीपावलीतील धनत्रयोदशीच्या दिवशी प्रत्येक घरात धन्वंतरी देवतेची पूजा करावी असे आवाहन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

मनुष्याचे आरोग्य उत्तम असेल, तर त्याच्या जीवनात सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचे आगमन होते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या पवित्र दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करून निरोगी जीवनाचा संकल्प करावा, असे त्यांनी सांगितले.

भारतीय संस्कृतीत आरोग्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. धन्वंतरी देवतेची उपासना ही केवळ धार्मिक परंपरा नसून आरोग्याबाबत जनजागृती करणारी प्रेरणादायी परंपरा आहे. दीपावलीचा पहला दिवस हा धनत्रयोदशीने सुरू होतो दीपोत्सवात आरोग्याला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे यावर्षीही देशातील प्रत्येक कुटुंबाने धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेची श्रद्धेने पूजा करावी आणि आरोग्यविषयक सवयी अंगीकाराव्यात, निरोगी आरोग्यासाठी योगाचा अंगीकार करावा असे आवाहन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button