*कुंभमेळ्याचा निधी शेतकरी मदतीकडे वळवावा – संभाजी ब्रिगेड*
*कुंभमेळा साधा केल्यास कोणतेच देव,साधुसंत नाराज होनार नाहीत - शेतकरी नेते पांडुरंग पाटील*

*कुंभमेळ्याचा निधी शेतकरी मदतीकडे वळवावा – संभाजी ब्रिगेड*
- *कुंभमेळा साधा केल्यास कोणतेच देव,साधुसंत नाराज होनार नाहीत – शेतकरी नेते पांडुरंग पाटील*
आज उभा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळांनी होरपळुन निघतोय.अनेक भागांत शेतकर्यांना लागवड खर्च लागुन बसलाय परंतु आता शेतातमद्ये अजिबात पिक नाहीए.हाच मुद्दा उपस्थित करत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेत्रुत्वात शेतकर्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवत विनंती केली की कुंभमेळ्याचा निधी शेतकरी मदतीकडे वळवन्यात यावा.यावेळी पाटील बोलताना म्हणाले की,जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला होता त्यावेळी शिवरायांनी स्वराज्याच्या तिजोर्या रयतेसाठी खुल्या करुन दिल्या होत्या.त्याच धर्तीवर आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अधिकाधीक निधी जगाचा पोषिंदा म्हणजेच शेतकर्यांकडे वळवन्याची आवश्यकता आहे.जर शेतकरी जगला तरच देश जगेल कारण तेव्हाच आपल्या ताटात अन्न येईल.पुढे बोलताना पाटील म्हणाले की,कुंभमेळ्यावर खर्च होनारा हजारो कोटींच्या निधीपैकी शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त निधी शेतकरी मदतीकडे वळवला व कुंभमेळा साध्या पद्धतीने केला तर कोणतेच देव किंवा साधुसंत नाराज होनार नाहीत.तेव्हा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात तात्काळ दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना हेक्टरी भरीव आर्थिक मदत उपलब्ध करुन द्यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करन्यात आली.तहसीलदार निलेश मडके यांच्या मार्फत निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवन्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड ता.कार्यकारीनी सदस्य महेशबाप्पु देशमुख,भागवत बाजड,ग्रामसेवा सोसायटी सदस्य राधाकृष्ण पवार,अरुन बोरे,किरण जुमडे,सुखदेव रहाटे,शेषराव बोरे,दिलीप पवार,प्रमोद बोरे आदींसहीत परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.यावेळी शेतकर्यांनी भावना व्यक्त करताना सांगीतले की, देवानेही पहीले इथला शेतकरी जगवन्यावरच भर दिला असता.तेव्हा सरकारने आता मायबाप बनत इथला शेतकरी कसा जगेल हेच प्राधान्याने बघावं.



