बातमी
आदिवासीबहुल कुवरदेव गावात राजर्षी शाहू परिवाराचे दिवाळी स्नेहमिलन
* दिवाळीचा फराळ व नवीन कपड्यांचे वाटप, २०० रुग्णांना मोफत आरोग्यसेवा

आदिवासीबहुल कुवरदेव गावात राजर्षी शाहू परिवाराचे दिवाळी स्नेहमिलन
* दिवाळीचा फराळ व नवीन कपड्यांचे वाटप, २०० रुग्णांना मोफत आरोग्यसेवा
जळगाव जामोद
तालुक्यातील कुवरदेव हे आदिवासीबहुल गाव असून, दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे येथे आजही अनेक मूलभूत सोयी-सुविधांची मर्यादित उपलब्धता आहे. या भागातील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. गेल्या आठ वर्षांपासून राजर्षी शाहू परिवाराच्यावतीने येथे दिवाळी सण साजरा करण्यात येतो. यंदाही धनत्रयोदशीच्या मंगलमय पर्वावर संदीपदादा शेळके व संस्थेच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांनी कुवरदेव येथे दिवाळी साजरी केली. यावेळी गावातील नागरिकांना दिवाळीचा फराळ व नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामस्थांसोबत स्नेहभोजन करून आनंदाचे क्षण साजरे करण्यात आले.
आदिवासी बहुल व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ सहजपणे मिळावा, तसेच आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने कुवरदेव गावात ४ नोव्हेंबर २०२६ रोजी राजर्षी शाहू परिवाराच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गरजू नागरिकांसाठी हे शिबिर विशेष दिलासादायक ठरले. या शिबिरात तब्बल २०० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक औषधीचे मोफत वाटप करण्यात आले.
या शिबिरात डॉ. सौ. उज्वला अविनाश पाटील (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ. नेहा फुंडकर (जामोद एम.ओ.), डॉ. एल. एस. साळोक (एच.ए. जामोद), डॉ. अमर रायपुरे (आरोग्य सेवक) व तनुजा चौधरी (ए.एन.एम. जामोद) यांनी रुग्णांची तपासणी केली.यावेळी राजर्षी शाहू फाउंडेशनचे कार्याध्यक्ष शैलेश काकडे, संस्थेच्या संचालिका छायाताई शेळके, रमेश सत्या (उपसरपंच, कुवरदेव), गणेश फाळके, सचिन फाळके, अमोल तायडे, हरिभाऊ शेळके, राजू शेळके, वासुदेव वायझोडे, श्याम वायझोडे, शरद महाराज, रवी काकडे, शरद मोहिते, संजय लोखंडे, वसंता इंगळे, लक्ष्मण वाडोदे, अनिल गावंडे, देविदास धोटे, विश्वनाथ गावंडे, रवींद्र गावंडे, पंकज काळे, संस्थेचे सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण, मुख्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
* हीच खरी सामाजिक बांधिलकी
आदिवासीबहुल आणि दुर्गम भागातील नागरिकांनाही आरोग्यसेवा, सण-उत्सवांचा आनंद आणि आपुलकीचा आधार मिळावा, या भावनेतून राजर्षी शाहू परिवार गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवत आहे.केवळ आर्थिक व्यवहार नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीच राजर्षी शाहू परिवाराची खरी सामाजिक बांधिलकी आहे.



