बातमी

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

बुलढाणा: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, समाधान गायकवाड, यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button