मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील मोहेगावच्या गट ग्रामपंचायत माळेगाव गरिबांच्या पोटावर मारू नका देवाभाऊ* ! –
*रिपाईच्या वतीने जनआंदोलन उभारणार - बाबासाहेब जाधव यांचा देवाभाऊ सरकारला थेट इशारा!*

*मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील मोहेगावच्या गट ग्रामपंचायत माळेगाव गरिबांच्या पोटावर मारू नका देवाभाऊ* ! –
*रिपाईच्या वतीने जनआंदोलन उभारणार – बाबासाहेब जाधव यांचा देवाभाऊ सरकारला थेट इशारा!*
बुलडाणा
देवाभाऊचे दुपटी धोरण सरकार एका बाजूने गरिबांच्या बाजूने निर्णय घेते आणि लाडक्या बहीण भावाची दिवाळी साजरी करते आणि दुसऱ्या बाजूने मोहादीवच्या बहीण भावाच्या तोंडातील घास काढून घेते आहे. एका बाजूने देवाभाऊ गरिबांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करतात व दुसऱ्या बाजूने त्यांच्याच ताटातील दिवाळी काढून गरिबांच्या छातीत खंजीर खुपसत आहे. बोर द्यायचा आणि आवळा काढून घ्यायचा, असा हा प्रकार आहे. गरिबांच्या पोटावर उठणाऱ्या या देवाभाऊच्या सरकारच्या धोरणाला आम्ही व महाराष्ट्राची जनता कधीच भीक घालणार नाही, असा घणाघात रिपाई जिल्हा संपर्क प्रमुख – आठवले पत्रकार बाबासाहेब जाधव आणि सम्राट संघटनेचे नेते पॅंथर आशिष बाबा खरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
हा महाराष्ट्र पुरोगामी विचारसरणीचा आहे. या महाराष्ट्राला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाभिमान शिकविला आहे. या सरकारला 2029 मध्ये देवाभाऊ, तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ, असा इशाराही बाबासाहेब जाधव व आशिष बाबा खरात यांनी दिला.
*मोहेगाव गटग्रामपंचायत मोहेगाव तालुका मोताळा येथील अदिवासींच्या पोटावर मारता पाठीवर मारा ?*
मोहेगावच्या गटग्रामपंचायत अंतर्गत मोहेगाव हे आदिवासी लोक आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहसाठी गेली 25 ते 30 वर्षापासून गुण्या गोविंदाने नांदत आहे पण हे देवाभाऊच सरकार आले मागासवर्गीयांच्या विरोधातील देवाभाऊ चांगले आहेत पण त्यांच्या हाताखालील तवे चपाटे चमचे हे काहीही सल्ला देतात व कच्याकानाचे आमचे देवाभाऊ ऐकून चालतात हे बरं नाही हे देवाभाऊलाच जड जाणार आहे तर वेळ गेली नाही मग कामाला लागा व माळेगाव ता. मोताळा येथील आदिवासी बांधवांचे वन हक्क दावे ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर झाले असतानाही, वन हक्क समितीने जातीवादी भावनेतून ते नामंजूर करण्याचा घाट घातला आहे. हे म्हणजे त्या गरिबांच्या मुलाबाळांच्या तोंडातला घास काढून घेण्यासारखे आहे. हे बरे नव्हे. तुम्हाला ही जनता माफ करणार नाही.
देवाभाऊ, विचार करा. त्यांच्याकडे पाहू नका, त्यांच्या मुलांकडे पाहा. त्यांच्या तोंडातील घास काढू नका. देव तुम्हाला माफ करणार नाही. वेळ प्रत्येकावर असते. वेळ बसून राहत नाही. प्रत्येकाचे दिवस येतात आणि जातात. ऊन-सावली सारखी सत्ता असते, हे विसरू नका.
*केंद्रीय मंत्री डॅा. आठवले जनतेच्या सोबत आहेत!*
आमचे लोकनेते डॅा.रामदास आठवले जरी तुमच्या सोबत आणि सत्तेत असतील, व आशिष बाबा खरात जरी एकनाथ शिंदे सोबत असतील पण ते जनतेच्या सोबत आहेत, हे विसरू नका. या मोहेगावच्या न्याय हक्कासाठी आम्ही जनआंदोलन उभारू आणि न्याय मिळवूनच देऊ.
*संघर्ष आमचा नारा आहे, तो मिळवल्याशिवाय राहणार नाही!*
देवाभाऊ, आता वेळ गेली नाही. सर्व काही तुमच्याच हातात आहे. लवकरच आदेश काढा आणि दिवाळीची या मोहेगावला भेट द्या. त्यांना आनंदाने दिवाळी साजरी करू द्या. बुलडाणा जिल्हाधिकारी व संबंधितांना आदेश द्या.
*जर त्यांची दिवाळी साजरी झाली नाही, तर रिपाई आठवले व सम्राट संघटना तुम्हाला दिवाळी साजरी करू देणार नाही!*
असा थेट इशारा रिपाई जिल्हा संपर्क प्रमुख – आठवले पत्राकार बाबासाहेब जाधव व सामाजिक कार्यकर्ते सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आशिष बाबा खरात यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे जिल्हाधिकारी शासन प्रशासनाला दिला आहे. जर न्याय मिळाला नाही तर रिपाई व सम्राट संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल त्याचे काही दुष्परिणाम झाले तर शासन प्रशासन जबाबदार राहील असा इशारा प्रसिद्धी परत्रकाव्दारे देण्यात आला आहे.



