Uncategorizedबातमी

बुलढाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्यावतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन; पदाधिकाऱ्यांनी जागवल्या आठवणी

*बुलढाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्यावतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन; पदाधिकाऱ्यांनी जागवल्या आठवणी*

बुलढाणा (प्रतिनिधी): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त बुलढाणा येथे विशेष अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली वाहिली तसेच आपल्या मनोगतातून बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखालील जुन्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिकांना सत्तेच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवले असून त्यांच्या विचारांचा आणि समाजकारणाचा वसा आपण सर्वांनी अधिक जोमाने पुढे नेला पाहिजे असे मत व्यक्त केले. पक्ष प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी बाळासाहेबांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे सांगून, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ताकद त्यांनी प्रत्येक शिवसैनिकाला दिली असल्याचे प्रतिपादन केले.

जिल्हा सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देत बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा मंत्र तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले, तर जिल्हा समन्वयक गजानन धांडे यांनी आगामी काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अभिप्रेत पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. महिला आघाडी तालुकाप्रमुख अनिता जाधव यांनी बाळासाहेबांनी महिलांना सन्मानाने जगण्याचे बळ दिले असून महिला आघाडीच्या माध्यमातून संघटनेचे काम अधिक व्यापक केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

या अभिवादन सभेला उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, बुलढाणा तालुकाप्रमुख विजय इतवारे, उपतालुकाप्रमुख भावना पाटील, शहर संपर्क प्रमुख सुनिल भाग्यवंत, शहर प्रमुख विजय राऊत, गणेश रिंढे, शाम सावळे, गजानन गवई, अरूण पाटील, श्रीकांत जाधव, निलेश हरकल, सोहिभाई , बबन खरे, मुंडे साहेब, अनिता गायकवाड, अर्चना शेळके, रत्ना शेळके, सुनिता कदम, श्रध्दा दाभाडे, भारती भारंबे, स्वाती लोंभेकर, रूपाली चव्हाण यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button