रविंद्र वाघ यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर 

रविंद्र वाघ यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर 

बुलढाणा 
      साप्ताहिक अखंड झेप चे मुख्य संपादक तथा असोसिएशन आँफ स्माँल अँन्ड मिडीयम न्युजपेपर्स आँफ इंडिया बुलढाणा जिल्हाध्यक्ष रविंद्र वाघ यांना मातोश्री वच्छलाबाई गवई शैक्षणिक संस्था साखरखेर्डा यांच्याकडुन सर्व श्रेष्ठ समजला जाणारा मानाचा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
     पत्रकार रविंद्र वाघ यांनी आपला प्रवास सामाजिक कार्यापासून ते पत्रकार क्षेत्रात मध्ये  दैनिक सायरन, बिग न्युज टिव्ही नेटवर्क ते दैनिक विश्व जगत गेल्या १८ वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात उपेक्षित वर्गातील लोकांना सामाजिक व पत्रकारिता क्षेत्राच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत, यापुढेही शेतकरी, शेतमजूर कष्टकरी सामाजिक लिखाण करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न ठेवल्याबद्दल सदर पुरस्कार 30 डिसेंबर 2023 रोजी एका शानदार समारंभामध्ये प्रधान करण्यात येणार आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *