जिल्हावासीयांना भावला विकास अन्  परिवर्तनाचा विचार  * वन बुलढाणा मिशन: संदीप शेळकेंनी साडेतीन महिन्यांत घेतले २८ संवाद मेळावे 

जिल्हावासीयांना भावला विकास अन्  परिवर्तनाचा विचार 

* वन बुलढाणा मिशन: संदीप शेळकेंनी साडेतीन महिन्यांत घेतले २८ संवाद मेळावे
बुलढाणा 
    वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके संवाद मेळाव्यांच्या माध्यमातून जिल्हा पिंजून काढत आहेत. चिखली तालुक्यातील ईसोली येथून १७ सप्टेंबर रोजी संवाद मेळाव्यांना प्रारंभ झाला. साडेतीन महिन्यांत आतापर्यंत त्यांनी २८ संवाद मेळावे घेतले आहेत. सर्वच मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विकास आणि परिवर्तनाचा विचार जिल्हावासीयांना भावल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. 
        राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके गेल्या २३ वर्षांपासून सहकारात कार्यरत आहेत. ग्राहकांना दर्जेदार बँकिंग सुविधा देत असतांनाच त्यांनी हजारो युवकांना रोजगार उपलब्ध केला आहे. जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन त्यांनी वन बुलढाणा मिशन ही लोकचळवळ सुरु केली आहे. विकासात जिल्हा अव्वलस्थानी पोहचवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. यासाठी त्यांनी जाहीरनामा जनतेचा ही संकल्पना आणली आहे. जनतेला जिल्ह्याचा विकास कसा हवा आणि याबाबत त्यांची काय मते आहेत हे जाणून घेण्यात येणार आहे. त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचे एकत्रित करुन जाहीरनामा तयार करण्यात येईल. हा असेल जनतेचा जाहीरनामा. राजकीय पक्ष आपला जाहीरनामा मांडतात. संदीप शेळके जनतेचा जाहीरनामा मांडणार आहेत.
        जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी त्यांनी दोन शक्तीपीठांना साकडे घातले. बुलढाणा येथील जगदंबा माता ते चिखलीची रेणुकामाता अशी पायदळ रॅली काढली होती. जिल्ह्याच्या मागासलेपणाचे सीमोल्लंघन करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.
 
* सिंचन, रोजगारावर देणार भर :
      बुलढाणा जिल्ह्याला मागासलेला जिल्हा म्हटले जाते. प्रत्येक जिल्हावासियास याच्या वेदना होतात. जिल्ह्यात एमआयडीसी नाहीत. मोठे उद्योग नाहीत. त्यामुळे युवकांना रोजगार नाही. प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचा आपल्याकडे अभाव आहे. जिल्ह्यात मोठे प्रकल्प आणण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. सिंचन, रोजगार, शिक्षण, आरोग्य, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यासह इतर समस्या प्रलंबित आहेत. वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून या प्रश्नांवर प्रामुख्याने काम करणार असल्याची भूमिका संदीप शेळके यांनी बोलून दाखवली आहे.
 
* चौथ्या टप्प्यात आठ गावांत झाले संवाद मेळावे :
       वन बुलढाणा मिशनच्या जाहीरनामा जनतेचा कार्यक्रमाअंतर्गत चार टप्प्यात आतापर्यंत २८ सभा झाल्या. तर चौथ्या टप्प्यात ८ सभा झाल्या. बुलढाणा तालुक्यातील मौढाळा येथे ८ डिसेंबरला चौथ्या टप्प्यातील पहिली सभा झाली. त्यांनतर ९ डिसेंबर रोजी चिखली तालुक्यातील मेरा बु., १० डिसेंबर जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी, ११ डिसेंबर मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी, १२ डिसेंबर संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, १३ डिसेंबर रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील वाघोरा, १४ डिसेंबर देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड भोई आणि १५ डिसेंबरला खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे सभा झाली. सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *