काँग्रेस स्थापना दिनी नागपूरात काँग्रेसची “है तैयार हम” भव्य रॅली – जिल्हाध्यक्ष मा. आ.राहुलभाउ बोंद्रे

काँग्रेस स्थापना दिनी नागपूरात काँग्रेसची “है तैयार हम” भव्य रॅली – जिल्हाध्यक्ष मा. आ.राहुलभाउ बोंद्रे

राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे जी, सोनिया गांधी,राहुल गांधी , प्रियंका गांधी यांची उपस्थिती राहणार.

 

जिल्हाभरातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते सभेला उपस्थित राहणार.

 

( प्रतिनिधी ) बुलडाणा, दि. १८ डिसेंबर २०२३

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची “है तैयार हम” महारॅली आयोजित करण्यात आली आहे. सदर अनुषंगाने काँग्रेस पक्षाने येत्या 28 डिसेंबर रोजी काँग्रेस स्थापना दिवस अतिशय भव्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.काँग्रेसच्या या महारॅलीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे जी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी, खा. मुकुलजी वासनिक, प्रदेश अध्यक्ष मा.आ नानाभाउ पटोले काँग्रेस पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, देशभरातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या महारॅलीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे यांनी दिली आहे.

बुलडाणा जिल्हा काँग्रेस मुख्यालयात आज काँग्रेस पक्ष स्थापना दिन तयारी निमित्त नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीस जिल्हाध्यक्ष मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे, अ. भा.काॅ. क. चे सचिव मा. आ.हर्षवर्धन सपकाळ, मा.आ. दिलीपकुमार सानंदा,प्रदेश उपाध्यक्ष अॅड संजय राठोड, प्रदेश सचिव रामविजय बुरूंगले, पक्षनेत्या सौ.स्वातीताई वाकेकर, प्रदेश सचिव हाजी जाहीद अली खान उर्फ दादू सेठ, जेष्ठ काँग्रेस नेते लक्ष्मणराव घुमरे, डाॅ. अरविंद कोलते, प्रदेश कार्याध्यक्ष सेवादल तेजेंद्रसींह चव्हाण, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, महीला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सौ. मंगलाताई पाटील, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष शैलेश खेडकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अॅड जावेद कुरेशी, जिल्हा सरचिटणीस सतिष मेहेंद्रे, यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा काँग्रेस ची नियोजन बैठक पार पडली.

यावेळेस उपस्थित मान्यवर नेते व पदाधिकाऱ्यांकडून नियोजन संदर्भात मार्गदर्शन व सुचना करण्यात आल्या.

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष बोंद्रे पुढे म्हणाले की, देशभरातून काँग्रेस पक्षाचे जनसमर्थन वाढत आहे, नुकत्याच झालेल्या चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षांच्या मतांमध्ये भरघोस वाढ दिसून आली. कर्नाटकनंतर काँग्रेसने तेलंगणातही स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन केली आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत असून देशाची संसदही सुरक्षित राहिलेली नाही तर देश कसा सुरक्षित असेल असा प्रश्न उपस्थित करून लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेवर आतापर्यंत दोनदा हल्ला झाला आणि दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्षाचेच सरकार होते. संसदेच्या सुरक्षेसंदर्भात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला प्रश्न विचारले असता, प्रश्न विचारणाऱ्या १४ सदस्यांनाच निलंबित करण्यात आले पण ज्या भाजपा खासदारांकडून या हल्लेखोरांना पास देण्यात आले होते त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई केली नाही.

नागपूर मध्ये होणाऱ्या महारॅलीला जिल्हाभरातून हजारो लोक उपस्थित राहतील. काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, पक्षाचे सर्व सेल व विभाग ही महारॅली यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील. लोकसभा निवडणुका तीन महिन्यांवरच असल्याने ही महारॅली काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह व ऊर्जा निर्माण करण्याचे काम करेल. नागपूर मध्ये होणारी महारॅली ऐतिहासिक असेल व देशात परिवर्तनाचा संकेत देणारी ठरेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस स्थापना दिनी सकाळी ९ वाजेपर्यंत केंद्र स्तरावर पक्षाचे ध्वजारोहण आयोजित करणार असून काँग्रेसची विचारधारा वाढविण्यात आणि स्वातंत्र्य लढ्यात आणि राष्ट्र उभारणीत पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहचवणार आहोत तसेच विविध संस्था, विभाग, बुद्धिजीवी इत्यादी नागरिकांशी व्यापक संपर्क साधण्यात येणार आहे.

यावेळेस सुभाष पैसोडे सभापती खामगाव बाजार समिती, अॅड हरिष रावळ, नंदुभाऊ शिंदे, अतुल सिरसाठ जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस, प्रवक्ता रवी पाटील, विजय पाटील शेजोळ जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग, गजानन खरात, एकनाथ चव्हाण, सय्यद इरफान, विनोद बेंडवाल, गणेशराव पाटील,सुनिल सपकाळ, चित्रांगण खंडारे,भास्करराव ठाकरे, देवानंद पवार, सुनिल तायडे, दत्ताभाऊ काकस, निलेश अंजनकर, मिलींद जैस्वाल, समाधान दामधर, अॅड मोहतेश्याम रजा, ईरफान पठाण, अॅड प्रविण सुरडकर, गजानन मामलकर, सिध्दार्थ जाधव, डाॅ. पुरूषोत्तम देवकर, रखमाजी राऊत, अॅड विजयसिंह राजपूत, राजू पाटील, बंडू चौधरी, अविनाश उमरकर, विजय काटोले, मनोज वानखेडे, जाकीर कुरेशी, सचिन बोंद्रे, शिवदास रिंढे, डाॅक्टर ईसरार, शिरीष डोरले, अजहर देशमुख, प्रकाश बस्सी,संजय सुळकर, राजेंद्र गायकवाड, महेंद्र गवई, रूषभ सावळे, दिलीप सानप, नितीन खराडे, मनोज जाधव, तुळशीराम नाईक,प्रमोद जाधव, तुषार खरे, अताउल्ला पठाण, रामदास रिंढे,विजय खोंडले, दिनेश घोती, शेख मुजाहिद, भास्कर आघाम, प्रकाश काळवाघे, आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक जेष्ठ काँग्रेस नेते लक्ष्मणराव घुमरे यांनी केले तर संचालन जिल्हा सरचिटणीस गणेशराव पाटील यांनी तर आभार जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह राजपूत यांनी केले

 

बाॅक्स
१३८ व्या काॅग्रेस पक्षस्थापना दिनानिमित्त पक्षनिधी उभारण्याचे काम सुरू झाले असून आज झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे यांनी ( 1,38000 ) एक लाख अडतिस हजार रूपयांचा चेक देत सर्वप्रथम निधी संकलन ची सुरूवात केली, तसेच जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मिलींद जैस्वाल व परिवहन विभाग चे जिल्हाध्यक्ष सय्यद ईरफान यांनी 13800 रू प्रत्येकी नगदी दिले. सदर चेक व रोख रक्कम जिल्हा प्रशासकीय सरटिणीस सतिष मेहेंद्रे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *