बुलडाण्यात रविवारी प्रबुद्ध-भारत वाचक मेळावा * प्रा.अंजलीताई आंबेडकर करणार मार्गदर्शन * सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे सतीश पवार यांचे आवाहन

कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी तिला वर्तमानपत्राची गरज असते, ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते, असे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या पाक्षिकाचा वाचक मेळावा २८ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता येथे आयोजित करण्यात आला आहे. 
 
      बहुजनांच्या आई प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याला वाचन प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक तथा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. उद्घाटनानंतर प्रा. अंजलीताई आंबेडकर प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक तथा प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, महासचिव राजेंद्र पातोडे, भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव तायडे, महिला प्रदेश उपाध्यक्ष सविताताई मुंढे, प्रबुद्ध भारतचे उपसंपादक जीतरत्न पटाईत, जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे, जिल्हा संघटक बालाभाऊ राऊत, विधी सल्लागार अमर इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष भीमराव सिरसाठ, तालुकाध्यक्ष समाधान डोंगरे, संजय धुरंदर, उद्धव वाकोडे, मधुकर शिंदे, दिलीप राठोड, शेख मोबीन, राजूभाऊ वाकोडे, अर्जुन खरात, विशाल गवई, डॉ. राहुल दाभाडे, संतोष कदम, राहुल वानखेडे, गौतम गवई, सतीश गुरचवळे, उत्तम पैठने, अनिल पारवे, सूरज सोनवणे, ॲड. एस. एस. वानखेडे, ॲड. कैलास कदम, ॲड. सुरडकर, विजय इंगळे, विशाल साळवे, दीपक सोनपसारे, सूर्यनंदन जाधव, राहुल बनसोडे यांची उपस्थिती राहणार आहे.
 
* स्वागतासाठी मोटारसायकल रॅली 
 
      अंजलीताई आंबेडकर यांच्यासह मान्यवरांचे विजयनगर येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या जोरदार स्वागतासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *