अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पथका समोर एकाने अंगावर डीजेल टाकून आत्मदहनाचा केला प्रयत्न

अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पथका समोर एकाने अंगावर डीजेल टाकून आत्मदहनाचा केला प्रयत्न
* शहर ठाण्यात गुन्ह्याची नोंद नाही

बुलडाणा
बुलडाणा शहरातील सर्क्युलर रोडवर डीएड कॉलेजच्या प्रांगणा समोर शासकीय भूखंडावर अतिक्रमण करून आपली उपजीविका चालवणाऱ्या लोकांना अतिक्रमण हटविण्यासाठी बुलढाणा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दोन-तीन वेळा जाऊन अतिक्रमण हटविन्याचे तोंडी सांगितले होते. अशात 15 मे 2024 रोजी नगरपालिका प्रशासनाने कडक भूमिका घेत अतिक्रमण निर्मूलन पथकाला त्या ठिकाणी पाठविले होते.
अतिक्रमण धारकांनी आपला अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. दरम्यान दुपारी 4 वाजेच्या सुमारास मधुकर जोगदंड यांनी अतिक्रमण उठविण्यासाठी आलेल्या नगरपालिकेच्या पथकासमोर अचानक आपल्या अंगावर डिझेल टाकून घेत दुकानात जाऊन दरवाजा बंद करून घेतला होता. नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुकानाचा दरवाजा उघडण्यासाठी अथक प्रयत्न करीत दरवाजा उघडून मधूकर जोगदंड यांना बाहेर काढले. सदर घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली होती.
याप्रकरणी बुलडाणा नगरपालिकेकडून कोणतीच तक्रार न दिल्यामुळे शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही,अशी माहिती ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी दिली आहे

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *