मोताळा येथे घटस्फोटित -परीतक्त्या परिषद व परिचय मेळाव्याचेआयोजन 

मोताळा येथे घटस्फोटित -परीतक्त्या परिषद व परिचय मेळाव्याचेआयोजन  

* प्रा. डी.एस. लहाने यांच्या संकल्पनेतील चौथी विधवा परिषद
बुलडाणा 
     विधवा घटस्फोटित महिलांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणे, त्यांचे विवाह घडवून आणणे, त्यांना समाजात सन्मानाचे स्थान देणे यासाठी प्रा. डी. एस. लहाने यांच्या संकल्पनेत तीन विधवा परिषदा जिल्ह्यात पार पडल्या आहे. तर चौथी विधवा, घटस्फोटित, परीतक्त्या परिषद व परिचय मेळावा चे आयोजन मोताळा येथे 30 मे 2024 रोजी करण्यात आले आहे.
 
      शिवसाई परिवार व मानस फाऊंडेशन द्वारा आतापर्यंत 25 विधवां घटफोटित महिलांची लग्नगाठ बांधण्यात आली आहे. शेकडो महिलांनी अनिस्ट रूढी परंपरा जुगारून दिल्यात. शासकीय योजना व घरकुलामध्ये विधवा महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. अनेक ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचे ठराव घेतले. विधवा महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देता आला हे सर्व जिल्ह्यांमध्ये झालेल्या विधवा घटस्फोटीत महिला परिषदेमुळे शक्य झाले. विधवा महिलांसोबत लग्न हा विषय आजही पचनी पडण्यास जड जात असल्याने विधवा परिषदेच्या माध्यमातून सामाजिक मानसिकता तयार करण्याचे काम उत्तम प्रकारे करण्यात आले आहे.
 
     अनेक अविवाहित तरूण आता विधवा घटस्फोटीत महिलांसोबत त्यांचा मुलाबाळांच्या स्वीकार करून लग्न करण्यास तयार झालेत. तीन परिषदांच्या माध्यमातून जवळपास 25 विधवा महिलांचे लग्न आतापर्यंत लागले आहे.
याची दखल राज्यस्तरावर घेतली गेली आहे. कोल्हापूर येथे चित्रपट निर्माता आर. के. मेहता यांनी प्रा. लहाने यांना बोलवून तिथे सुद्धा परिषदेचे आयोजन केले आहे. हा उपक्रम राज्यभर दखलपात्र होत आहे. तर मोताळा येथे दिनांक 30 मे रोजी विधवा परिषद आयोजित करण्यात आली आहे. समाजिक बदलाचे पाऊल ठरणाऱ्या या परिषदेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
 
* विधवा परिषदेत सहभागी व्हावे -प्रा. लहाने
 
     पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजही विधवा महिलांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्या मुलांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, त्यांच्या रोजगाराच्या देखील समस्या आहेत. त्यांना सुद्धा जोडीदाराची गरज आहे. याचा विचारच समाज करत नाही. अनेक घटस्फोटीत महिलांनी सोसलेल्या त्रासामुळे त्यांना पुनर्विवाह नको, असे वाटते तर दुसऱ्या बाजूला अनेक तरुणांना लग्नासाठी मुलीच मिळत नाही. अशावेळी काळाची पाऊले ओळखून तरुणांनी विधवा घटस्फोटीत महिलांच्या मुला बाळांना स्वीकारून त्यांच्यासोबत विवाह करणे गरजेचे आहे.
  मोताळा येथे आयोजित परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक प्रा. डी.एस. लहाने यांनी केले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *