सहकार विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेजचा स्टेट बोर्ड इ.12 वी मध्ये 100 टक्के यश

  1. सहकार विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेजचा स्टेट बोर्ड इ.12 वी मध्ये 100 टक्के यश
बुलडाणा 
     स्थानिक सहकार विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज या स्टेट बोर्ड मान्यता प्राप्त निवासी व अनिवासी शाळेच्या विद्याथ्र्यांनी अभुतपुर्व यशासह बारावीच्या परिक्षेत यश मिळविले. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व विद्यार्थी अत्यंत उत्कृष्ट गुणांसह यशस्वी झाले आहेत. या यशाने सहकार विद्या मंदिरने विद्यार्थ्यांवर  घेतलेल्या कठोर परिश्रम व सर्वांगीण विकासावर मोहोर उमटवली.
वाणिज्य शाखेतुन कु.बागेश्री कुळकर्णी हिने 92.17% मिळवित विद्यालयातुन प्रथम क्रमांक मिळविला तर दुसरा क्रमांकावर चि.रोहित लेखरजनी याने 91.33% मिळविले तर कु. अनुष्का
ठाकुरद्वारे, चि. रितेश गोसावी व कु.श्रध्दा लव्हाळे यांनी 90.67% गुण प्राप्त करुन तिस­या क्रमांक मिळविला. अभिमानास्पद बाब म्हणजे 85% पेक्षा जास्त 21 विद्यार्थ्यांनी यश मिळालेल्या विद्यार्थ्यांची  नावे खालील प्रमाणे कु.भक्ती लव्हाळे, प्रतिक्षा पंडीत, तुषार पवार, अथर्व शर्मा, अयुष वायकोस, धनश्री खोचर, साची मालु, वेदांत जोशी, अयुष मुळे, साहिल असरानी, अनिकेत वालके, यश वानखेडे, प्रथमेश पसपुलकर, संस्कृती दाभाडे, रितीका चोपडा, रुद्र भार्गव, सोबत विज्ञान शाखेतुन कु. शामली जाधव हिने 88.17% मिळवित विद्यालयातुन प्रथम क्रमांक मिळविला तर दुसरा क्रमांकावर कु. कोमल शेळके याने 88.00% मिळविले तर चि. अथर्व जांगीड व कु.चैताली अग्रवाल यांनी 86.83% गुण प्राप्त करुन तिस­या क्रमांक मिळविला. तुषार प्रेमचंद राठोड 81 .67 % गुण मिळाले. 
 त्याचप्रमाणे 80% पेक्षा जास्त 7 विद्यार्थ्यांनी यश मिळालेल्या विद्यार्थ्यांची  नावे खालील प्रमाणे कु.इशिका छनवाल, आदित्य जयस्वाल, कु. प्रतिक्षा बांगर.
बुलडाण्यासारख्या ग्रामीण भागात वसलेल्या या शाळेचे वैशिष्टे म्हणजे केवळ महाराष्ट्रातून नाही तर देशातील विविध राज्यातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. शाळेचे निर्सगरम्य वातावरण, पारंपारिक शिक्षण शैलीसह आधुनिक तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांना  शिकविण्याची पद्धती, भव्य क्रिडांगण तसेच विद्यार्थ्यांच्या  सर्वांगीण विकासावर देण्यात येणारे लक्ष हे या शाळेची वैशिष्ट आहेत.
    विद्यार्थ्यांनी  प्राप्त केलेल्या या यशाबद्दल बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, संस्थेच्या अध्यक्षा सौ.कोमल झंवर, संस्थेचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ.सुकेश झंवर, प्राचार्य व मुख्यध्यापक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे  व शिक्षकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. विद्यार्थ्यांनी  त्यांच्या यशाचे श्रेय अध्यक्षा सौ.कोमल झंवर, प्राचार्य, मुख्यध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांना दिले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *