जनआधार मानवसेवा बहुउद्देशीय संस्था सागवन जिल्हा बुलढाणा यांच्यातर्फे पक्षांविषयी उपक्रम*

*जनआधार मानवसेवा बहुउद्देशीय संस्था सागवन जिल्हा बुलढाणा यांच्यातर्फे पक्षांविषयी उपक्रम

 

कडक उन्हाचा त्रास जसा मानवाला होतो तसा पशु पक्षांनाही होतो उन्हामुळे पक्षांनाही उष्माघात होतो त्यांनाही तहान लागते उन्हाळ्यात माणसांप्रमाणेच प्राणी आणि पशुपक्ष्यांनाही पाण्याची सर्वाधिक गरज भासते पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पाण्याची तहान भागविण्यासाठी पक्षांची अविरत धडपड सुरू असते या धडपडीला सुसह्य करून त्यांच्या जीवाला थोडासा गारवा देण्यासाठी गरज असते वाटीभर पाण्याची… त्यासाठी प्रत्येकाने घराच्या अंगणात परसात बागेत गॅलरीमध्ये पक्ष्यांसाठी पाणी ठेवा असे आवाहन आपले बुलढाणा जिल्ह्यातील जनआधार मानवसेवा बहुउद्देशीय संस्था यांनी केले आहे. तसेच संस्थेचे वतीने संस्था अध्यक्ष ॲड.अमोलकुमार गवई यांनी पक्षांविषयी माहिती देत असताना सांगितले की , अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक असणारे पक्षी पर्यावरण रक्षक आहेत संपूर्ण मानव जातीसाठी पक्षांची भूमिका व अस्तित्व महत्त्वाचे आहे.पर्यावरणाचे स्वच्छता दूत असणारे हे जीव आपल्याला खूप काही शिकवतात त्या बदल्यात आपण मात्र त्यांचे अन्न पाणी निवारा सगळेच हिरावून घेतले झाडांची संख्या कमी झाली त्यामुळे पक्षांचा नैसर्गिक अधिवास हिरावला गेला यंदा तर मार्चपूर्वीच कडक उन्हाळा सुरू झाल्याने पक्षांनाही उन्हाचा त्रास होत आहे त्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी प्रत्येकाने पक्षांसाठी पाणी ठेवायलाच हवे हा उद्देश घेऊन जनआधार मानवसेवा बहुउद्देशीय संस्था सागवन  येथील राजुर घाटात पक्षांसाठी मातीच्या भांड्यांमध्ये झाडांवरती पाणवठे तयार करून लावले आहे त्यावेळी उपस्थित संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष ॲड. अमोलकुमार गवई ,सचिव ॲड.स्वप्नील खंडारे , प्रतीक परिहार ,आशिष कानडजे, सुमित जुमडे ॲड अक्षय तोत्रे इत्यादी हजर होते.*

 

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *