समाज बदलाचे कृतीयुक्त पाऊल पडले बुलडाण्यातून… ‘नाम फाऊंडेशन’ चे हरीष इतापे येणार विधवा परिषदे साठी

समाज बदलाचे कृतीयुक्त पाऊल पडले बुलडाण्यातून…

‘नाम फाऊंडेशन’ चे हरीष इतापे येणार विधवा परिषदे साठी

बुलडाणा

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांनी स्थापन केलेल्या नाम फाउंडेशन चे संस्थापक सदस्य व मराठीतील दिग्गज चित्रपट निर्माता हरिष इतापे 30 मे रोजी जिल्ह्यात येत आहे. मोताळा येथे आयोजित विधवा परिषदेत हरीश इतापे सहभागी होणार असून पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या,व महाराष्ट्रातील सर्वोत्तम अधिकारी घडविणारी संस्था ‘यशदा’ च्या प्रशिक्षक पुस्पलता भोरे यांचीही उपस्थिती राहणार आहे.पुस्पलता भोरे स्त्री पुरुष समानतेसाठी गेल्या 30 वर्ष्यापासून कार्य करीत आहे.

विधवा विवाह व विधवांच्या पुनरुत्थानासाठी शिवसाई परिवाराचे प्रा. डी एस लहाने यांनी प्रयत्न चालविले आहे. जिल्ह्यात झालेल्या विधवा परिषदा, विधवा विवाह सोहळे समाज परिवर्तनाची नांदी ठरले आहे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्यानंतर दीडशे वर्षांनी विधवा विवाहाची चळवळ जोर धरत आहे. त्याची सुरुवात प्रा. लहाने यांनी बुलढाणा येथुन केली आहे. याची दखल राज्यभर घेतल्या जात आहे.मोताळा येथील परिषद तरुण मुलांना जोडीदार मिळवून देण्यासाठी सहाय्यक व विधवांना सन्मान प्रदान करणारी ठरेल असा विश्वास प्रा.लहाने यांनी व्यक्त केला आहे.

कोण आहेत इतापे

नाम फाउंडेशन च्या माध्यमातून नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे, हरिष इतापे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी महत्त्वाचे प्रयत्न केले आहेत. या कुटुंबांना आधार देण्यासाठी नाना पाटेकर यांनी राज्य पिंजून काढले होते. त्यांचे सहकारी असणारे मराठी चित्रपट निर्माता इतापे हे सुद्धा विधवा विवाहा साठी प्रयत्न करीत आहेत. याच विषयावर त्यांनी ‘चित्रपटही काढलेला आहे.बुलडाणा आले असता त्यांनी लहाने यांची भेटही घेतली होती.याच वेळी त्यांनी आगामी परिषदेसाठी येण्याचे मान्य केले होते.

 

लग्नाळूनी सहभागी व्हावे –लहाने

मोताळा येथे 30 मे रोजी विधवा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या विधवा परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमास विधवा, विवाह इच्छुक तरुण, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आवर्जून उपस्थिती लावावी असे आवाहन आयोजक प्रा.डी एस लहाने, पत्रकार गणेश निकम, प्रा. शहीणाताई पठाण, एडवोकेट संदीप जाधव, गजानन मुळे, प्रतिभा भुतेकर,प्रा. जोती पाटील,अनिता कापरे, गौरव देशमुख आदींनी केले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *