*झूंज भाई सोमचंद्र दाभाडे या आंबेडकरी चळवळीतल्या एका ढाण्या वाघाची*

*झूंज भाई सोमचंद्र दाभाडे या आंबेडकरी चळवळीतल्या एका ढाण्या वाघाची*
————————————-


समाजात आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता तयार होण्यासाठी विस ,पंचविस तीस वर्ष लागतात.कार्यकर्त्याच काम काही सोपे नसते.त्यासाठी खूप भांडवल खर्च झालेल असते.
कार्यकर्ते समाजासाठी झटत असतात, झगडत असतात .सूखासुखी कार्यकर्त्यांच्या पदरात काहीही पडत नसत त्यासाठी त्याग ही आवश्यक असतो आणि कार्यकर्त्याच्या त्यागाच्या तेजावर चळवळ ऊभी रहात असते.
त्याच अनूशंघाने भाई सोमचंद्र दाभाडे हे बूलढाणा जिह्यातील आंबेडकरी चळवळीतल एक मोठ नाव. त्यांनी त्याग आणि निष्ठेच्या बळावर जिल्ह्यात चळवळ ऊभी केली. विद्यार्थी दशे पासूनच
मराठवाडा विद्यापीठ आंदोलनात पेटून ऊठलेला हा बिन्नीचा शिलेदार आपल्या कत्वृत्वाने, वक्तृत्वाने, नेतृत्वाने बुलढाणा जिल्ह्यातील आंबेडकरी सामाजाच्या गळ्यातला ताईत झाला. चळवळीचा लोकप्रिय नेता झाला. कूशल संघटक, मानस जोडण्याची कला हे गूण अंगीच असल्यामूळे हजारो तरुण कार्यकर्त्यांची फौज सोमचंद्र भाईंनी ऊभी केली.
भाई सोमचंद्र दाभाडे म्हणजे गजबजलेल्या वस्तीच गाव.
भाई वाळवंटात जरी गेले तरी तिथे जञा भरविण्याचे सामर्थ्य त्यांच्या नेतृत्वात होत.
भाईंचा स्वभाव मेनाहून ही मऊ,पण अन्याय अत्याचार दिसला की वज्राहून ही कठोर .
खूप हळव्या मनाचा हा चळवळीचा नेता आपल्या सहका-याची आठवण काढतांना अगदी मायेन म्हणतो
भाई अशांत वानखेडे, भाई प्रदिप अंभोरे, भाई कैलास सुखधाने, भाई दिलीप खरात, दिलीपभाऊ जाधव, भाई निळकंठ वानखेडे, संतोषभाऊ मेढे, सुपडा गरूडे ,
गूलाबराव सरदार, आदि अनेक मिञांनी मला चळवळीत मनापासुन साथ दिली. या सर्व मिञांचे ऊपकार मी शिलालेखा सारखे काळजावर कोरून ठेवले आहेत. असे भावणीक उदगार त्यांनी काढले.
जिव लावणारे शब्द आयूष्य घडवितात,
जिव्हारी लागणारे शब्द आयूष्य बिघडवितात.
शब्द प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात.
शब्द यश देतात,शब्द नात देतात.
शब्द आयूष्यभर मनामनात जपणारी भावना देतात.
शब्दाच मोल जानल की आपल आयूष्य अनमोल होत.
हे चळवळीच अनमोल नात सोमचंद्र भाई निकराने निभावतांना दिसत आहेत.
गेल्या पंधरा वर्षा पासून ते एका दिर्घ अाजाराने आजारी आहेत. अशा परिस्थितीत देखील अन्याय अत्याचाराची हाळी त्यांच्या कानापर्यत जरी गेली तर हा ढाण्या वाघ अशाही परिस्थीतीत मैदानात डरकाळी फोडायला तप्पर आहे. आंबेडकरी चळवळीची धार बोथट झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
दिनांक 22 मे 2024 रोजी बूलढाणा येथे जाऊन त्यांची संतोष मेढे, निळकंठ वानखेडे ऊपविभागीय अभीयंता विजय मोरे साहेब यांचेसह भेट घेतली.
चळवळीच्या जून्या आठवणींना पून्हा ऊजाळा मिळाला.
प्रार्थणा ह्या धर्मनिरपेक्ष भावणांच्या प्रतीक असतात. प्रार्थनेमध्ये सहस्ञ हत्तीचे बळ असते .म्हणूनच आंबेडकरी चळवळीतल्या या नेत्याला निरोगी व दिर्घ आयूष्य लाभो.अशी तथागत चरणी प्रार्थणा करतो.
झेंडा भला कामाचा तू घेवून निघाला,
काटकूट वाटमंधी बोचती त्याला,
रगत निघल,तरी बी हसल शाबासतेची,
तू चाल पूढं तूला रं गड्या भीती कशाची ।
भाई सोमचंद्र दाभाडे यांना
क्रांतीकारी जयभीम.

***************************
आपला साथी
भाई कैलास सुखधाने
मेहकर

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *