बातमी

खा.भाई चंद्रशेखर आझाद व महाराष्ट्र पक्षश्रेष्ठी च्या पूर्वपरवानगीशिवाय जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा निर्णय नाही – भाई सिद्धांत वानखेडे*

खा.भाई चंद्रशेखर आझाद व महाराष्ट्र पक्षश्रेष्ठी च्या पूर्वपरवानगीशिवाय जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा निर्णय नाही – भाई सिद्धांत वानखेडे

 

भीम आर्मी व आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आजाद व महाराष्ट्र पक्षश्रेष्ठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंदजी लोंढे, महा. मुख्य सचिव मनीष साठे ,महिला प्रदेशाध्यक्ष नेहा ताई शिंदे, महा. उप .अध्यक्ष वसंतराव वक्ते, इत्यादी सर्व वरिष्ठ पक्षश्रेष्ठींचा आदेश अथवा सूचना जोपर्यंत येत नाही. तोपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकी संदर्भात कोणताच निर्णय घेतल्या जाणार नाही असे प्रतिपादन आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. आझाद समाज पार्टी व भीम आर्मी उत्तर प्रदेशातच नव्हे तर महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या इतर राज्यातील खूप मोठ्या प्रमाणात गरुड झेप घेऊ पाहत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा वाढता लोंढा ,पाहून सर्व इच्छुक कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना व नवख्या उमेदवारांना आझाद समाज पार्टी, भीम आर्मी च्या उमेदवाराकडे डोळे चातकाप्रमाणे पहात आहे त्यामुळे हजारो कार्यकर्त्यांची येत असलेले फोन व त्यांचे होत असलेल्या मागण्या विचारात घेता सर्वांना सुचित करण्यात येते की महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठी किंवा पक्षप्रमुख सर्वेसर्वा मा. खा. भाई चंद्रशेखर आजाद यांचा आदेश येईपर्यंत आपण सर्वांनी पक्षाचे काम तन-मन-धनाने करावे व आपल्यातून च उमेदवार दिला जाईल व आपल्यालाच उमेदवारी ची संधी दिली जाईल, अशी ग्वाही यावेळी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे यांनी सर्व सात ही विधान सभा प्रमुखांना दिली. गतवर्षी 2024 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवरती संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले असून बुलढाणा जिल्ह्यात अनेकांना सुद्धा विधानसभा निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत आणि प्रत्येक पक्ष सामाजिक संघटना आप आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीला लागला असून काही नवीन उमेदवारांना देखील विधानसभा निवडणुकीची कुतूहलता वाटू लागली आहे प्रत्येक पक्ष संघटना आप आपला उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात लढवित असताना संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष भीम आर्मी तथा आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांचा पक्ष आझाद समाज पार्टी ,(भीम आर्मी) जिल्ह्यात कोणता उमेदवार देणार आहे का या संदर्भी जिल्हाध्यक्ष सिद्धांत वानखेडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी असे प्रतिपादन केले की अजून पर्यंत मला व माझ्या जिल्हा कार्यकारणीला या संदर्भी पक्षश्रेष्ठीचा कोणताच आदेश अथवा सूचना आली नाही निवडणूक लढवण्याचा व उमेदवार उभे करण्याचा सर्वस्वी अधिकार पक्ष नेतृत्व तथा महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठी यांना आहे त्यामुळे या संदर्भी मला अजून कोणताच आदेश आला नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये सात विधानसभा असून त्यामध्ये चिखली, बुलढाणा, मेहकर, सिंदखेडराजा, खामगाव ,जळगाव जामोद व मलकापूर यापैकी कोणत्याच विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याचा किंवा या मतदारसंघात कोणालाच उमेदवारी देण्याचे अजून पर्यंत तरी जाहीर झाले नाही जेव्हाही मला व माझ्या जिल्हा कार्यकारणीला या संदर्भात माहिती किंवा सूचना पक्षश्रेष्ठीकडून देण्यात येईल तेव्हा या संदर्भात सर्व काही जाहीर केल्या जाईल त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जनतेने व इच्छुक उमेदवारांनी कोणाच्याही आमिषाला किंवा भूलथापांना बळी पडू नये असे आव्हान जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखडे यांनी सर्वांना केले आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button