बातमी

मनोज दांडगे यांच्या पुढाकारातून शासकीय सेवेत निवड झालेल्या युवक-युवतींचा सत्कार

मनोज दांडगे यांच्या पुढाकारातून शासकीय सेवेत निवड झालेल्या युवक-युवतींचा सत्कार

धाड : वत्सलाबाई दांडगे बहुउद्देशीय संस्था, जामठी, जन्मभूमी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, चिखली तसेच ज्ञानदेवराव बापू दांडगे शैक्षणिक संकुल, धाड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज दांडगे यांच्या वतीने परिसरातील सैन्य दल, पोलीस दल तसेच विविध शासकीय सेवांमध्ये निवड झालेल्या कर्तृत्ववान युवक-युवती व त्यांच्या पालकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
ज्ञानदेवराव बापू दांडगे शैक्षणिक संकुल, धाड येथे सकाळी ९ वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस होते. प्रमुख अतिथी म्हणून गणेश नरवाडे, निलेश देठे, राजू नागवे, विजय पाटील, जक्काशेठ, संतोष दांडगे, उमेश दांडगे, प्रफुल दांडगे, श्रद्धा दांडगे, निर्मला तायडे, धामणगावचे सरपंच दिलीप सुरडकर, निलेश राऊत, माळी, देवेंद्र पायघन, हरिभाऊ कड, उत्तम रुस्तुके, गजानन मगर, रमेश कोथलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सैन्य दल, पोलीस दल व विविध शासकीय सेवांमध्ये निवड झालेल्या युवक-युवतींसह त्यांच्या पालकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात प्रताप भोस यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्य यांच्या बळावर मोठे यश संपादन करता येते, असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन केले.
मनोज दांडगे हे गुणवंत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणारे युवक-युवती तसेच सैन्य दल व पोलीस दलात निवड झालेल्या तरुणांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळत असून समाजात शिक्षण व गुणवत्तेला चालना मिळत आहे.
कार्यक्रमास दांडगे परिवारातील सदस्य, पालक वर्ग तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य संतोष डवले यांनी केले, तर संस्थेचे सचिव उमेश दांडगे यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button