बुलढाणा पोलिसांचा मनमानी कारभार हा गृहमंत्र्याच्या वरद हस्तने उ बा ठा प्रवक्ता जयश्री शेळके यांचा आरोप

*बुलढाणा पोलिसांचा मनमानी कारभार हा गृहमंत्र्याच्या वरद हस्तने जयश्री शेळके यांचा आरोप
*जळगाव जामोद मधील कथित शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडाने बुलढाण्याचं नाव राज्यात बदनाम.*
*शिवसेना ठाकरे गटाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांना धरलं धारेवर.*
बुलढाण्यातील कथित शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडाला एक महिना उलटून गेला तरी मात्र मूळ अनोळखी महिलेचा मिळालेला मृतदेह व त्याबद्दलची ओळख याबाबत पोलिसांचे हात रिकामेच असून बुलढाणा पोलिसांचा मनमानी कारभार हा गृहमंत्र्यांच्या वरदहस्ताने सुरू असून दोन निष्पाप आदिवासींना 22 दिवस कारागृहात डांबून ठेवणारा आहे व त्यामुळे बुलढाण्याचं नाव राज्यभरात खराब झालं आहे. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून दोन पिता पुत्र आदिवासींनी न केलेल्या गुन्ह्याबाबत सजा देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यप्रवक्ता जयश्री शेळके यांनी केली आज त्यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला जाऊन याबाबत पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.



