छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद ) भिमटेकडी येथील विश्वशांती बुध्द विहारात भिमजयंती ते बुध्दजयंती बुद्धिस्ट फेस्टिवल 2026 उत्साहात संपन्न

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद ) भिमटेकडी येथील विश्वशांती बुध्द विहारात भिमजयंती ते बुध्दजयंती बुद्धिस्ट फेस्टिवल 2026 उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर :- डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संभाजीनगर (औरंगाबाद) येथील विश्वशांती बुद्ध विहार,भीम टेकडी,जटवाडा सुभाष नगर येथे 2026 बुद्धिस्ट फेस्टिवल अंतर्गत भिमजयंती ते बुध्दजयंती च्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचा व बुध्दभिम गीतांचा कार्यक्रम कार्यक्रम 17 मे ला संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष पु.भदन्त खेमोधम्मोजी महास्थवीर, उद्घाटक मुंबईचे सेवानिवृत्त जिल्हाधिकारी शिस्तप्रिय प्रशासक रोकठोक व्यक्तीमत्व उत्तमरावजी खोब्रागडे, विशेष अतिथी जेष्ठ साहीत्तीक प्रा.डॅा.ऋषिकेशजी कांबळे, विशेष उपस्थिती श्रद्धा हॅास्पिटल औरंगाबादचे डॅा. मानवजी पगारे, जेष्ठसमाजसेवीका अनिताताई हिवाळे, जेष्ठ पत्रकार बुलडाणा बाबासाहेब जाधव, नगरसेवीका विजयश्री जाधव यांचे पती आशिष जाधव होते.
सर्व प्रथम महाकरूणीक भगवान गौतम बुद्धांच्या व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहूणे व आयोजीका पु.प्रा.भिक्खुणी माताजी धम्मदर्शना महाथेरी व भंते संघपाल यांनी दिपधूप पुष्पाने पुजन करून बुध्द वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा माताजी धम्मदर्शना महाथेरी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून माताजी व भंते संघपाल यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष खेमोधम्मोजी महास्थवीर यांना चिवरदान व प्रमुख पाहुण्यांचा पुष्प गुच्छ शाल देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमाचे प्रस्तावित आयोजिका भारतीय विनय अलंकार धम्मज्ञान प्रशिक्षण केंद्र भिमटेकडीच्या संस्थापीका माताजी धम्मदर्शना महाथेरी यांनी येथील कार्याचा संपूर्ण आढावा सांगितला.
वयाच्या तेराव्या वर्षी चिवर परिधान करून बौध्द धर्माचा स्वीकार केला व त्यांच्या 32 वर्षांचा आपल्या संघर्षमय जीवनप्रवासाचा आढावा घेतला.
जिवन संघर्ष कसा केला या संघर्षातून भिमटेकडीच्या वसाड वनात हिवराच्या झाडाखाली राहून एमए,बीएड,एमएड,एमफिल,पाली शिक्षण घेतले वसाड वनाचे नंदनवन केले या नंदनवनात बुध्दविहार, पासष्ट फुट बुध्दाची महानिर्वाण मुद्रा, शंभर बेडचे हाऊस्पिटल, पाली स्कूल, इंग्लिश स्कुल, मुलांचे वस्तीगृह व आता साठ आयएएस-आयपीएस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.समाजहितासाठी सुरू असलेल्या या प्रकल्पांना समाजातील धम्मदाते आणि दानसूर व्यक्तींनी तन,मन आणि धनाने सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी केले.
भिमजयंती ते बुद्धजयंती संयुक्त विद्यमानाने बुध्दिस्ट फेस्टिवल 2026 व्दारे भिमजयंती व बुध्दजयंती कशी साजरी करावयाची त्याचा समाजावर होणारा परिणाम या बाबत मान्यवरांचे व्याख्यान 17 मे रोजी एक महीण्याच्या
या शिबिरात ४० श्रामनेर-श्रामनेरी यांना बौद्ध धम्म विषयक प्रशिक्षण देण्यात आले.या समारोपीय कार्यक्रमात व्याख्यानमालेचे आयोजन व भिमबुध्द गिताचा प्रबोधनाचा कार्यक्रम करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत खेमधम्मो हे होते. आपल्या उद्घाटनीय भाषणात माजी आयएएस अधिकारी मुंबईचे जिल्हाधिकारी उत्तमरावजी खोब्रागडे यांनी बौद्ध धम्मातील समतावादी, विज्ञानवादी तत्त्वांवर,जून्यारूढीपरेंपरेवर प्रकाश टाकला.व्याख्याते डॅा.मानव पगारे यांनी बौद्ध धम्माशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.ज्येष्ठ पत्रकार बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव यांनी दान पारमितेचे महत्त्व सांगितले, तसेच तथागताचे तत्वज्ञान व महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ज्या ज्या कुटूंबांनी, समाजांनी आत्मसात केले त्या त्या समाजाची व कुटुंबाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही.
शिक्षण हे वाघीनीचे दुध्द आहे ते पीले की, मनुष्य गुरगुरल्या शिवाय राहत नाही म्हणून प्रत्येक मनुष्यांनी हे शिक्षणाच दुध्द पुल्याच पाहीजे त्यातच मानव जातीची प्रगती आहे असे विचार मांडले. तर समाजसेविका अनिताताई हिवाळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालण्याचा सल्ला दिला. आंबेडकरी तत्त्ववेत्ते जेष्ठ साहीत्तीक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगितले. बुध्दाची करूणा आणि डॅा. बाबासाहेबांचा आंबेडकर स्वाभिमान अंगीकारल्यास जिवन यशस्वी होते, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात भदंत खेमधम्मो यांनी बौद्ध धम्मातील मनोविज्ञानावर प्रकाश टाकला.
उपस्थित मान्यवरांनी आयोजिका माताजी धम्मदर्शना महाथेरी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माता धम्मदर्शना यांनी तर आभार प्रदर्शन सुमित दांडगे यांनी केले.या प्रसंगी बुलढाणा जिल्ह्यातील आदरणीय भंते संघपाल यांची विशेष उपस्थिती होती.या प्रसंगी श्रामनेर शिबिरातील सर्व शिबिरार्थींना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.धम्म प्रचारचे संपादक प्रल्हाद गवळी यांचा प्रशस्ती पत्र देऊन सत्कार केला. या कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी विमलताई जाधव,निळे प्रतिकचे संपादक रतनकुमार साळवे,आदर्श शिक्षक उज्वलकुमार म्हस्के, समाजसेवक पंडीतराव बोर्डे, धम्मउपासक वैभव सिरसाठ यांच्यासह बौद्ध उपासक-उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर उमाळे,अनिकेत ओव्हाळ,नितेश उमाळे,जोगेंद्र तायडे, भाग्यशाली तायडे, शितल सिरसाठ यांनी परिश्रम घेतले. शरणय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.



