बातमी

बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग राबविण्यात यावा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी

*बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग राबविण्यात यावा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी.*

बुलढाणा( प्रतिनिधी) पावसाने दडी मारलेल्या महाराष्ट्रातील भागांमध्ये अनुकूल हवामान परिस्थिती असल्यास कृत्रिम पर्जन्य (Cloud Seeding) प्रयोग तातडीने राबविण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी एका लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
दि 5 सप्टेंबर 2026 रोजी ईमेल व्दारे मुखमंत्र्यांना दिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी सध्याच्या कालावधीतील पाऊस अत्यंत महत्त्वाचा असून, पावसाचा खंड कायम राहिल्यास पिकांवर तसेच जलसाठे व भूजल पुनर्भरणावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लवकर पाऊस न पडल्यास हातातोंडाशी आलेला पिकांचा घास शेतकऱ्यांच्या हातून निघून जाणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अलीकडील साप्ताहिक पर्जन्यमान अहवालानुसार, २ सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात बुलडाणा जिल्ह्यातील पर्जन्यमान सामान्यापेक्षा सुमारे ८७ टक्के कमी नोंदविण्यात आले आहे. ही बाब जिल्ह्यातील सद्यस्थितीचे गांभीर्य दर्शविते.
तसेच, उपलब्ध दैनंदिन हवामान नोंदीनुसार बुलडाणा येथे २ ते ३ सप्टेंबरदरम्यानच्या २४ तासांत पावसाची नोंद झालेली नाही, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या अहवालात उपलब्ध आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पारंपरिक उपाययोजनांसोबतच उपलब्ध असलेल्या आधुनिक वैज्ञानिक व तांत्रिक पर्यायांचाही तातडीने विचार करणे आवश्यक आहे.
कृत्रिम पर्जन्य निर्मिती (Cloud Seeding) हा त्यापैकी एक संभाव्य पर्याय आहे. या प्रक्रियेद्वारे पाऊस पडण्याची निश्चित हमी जरी नसली तरी त्यासाठी विशिष्ट प्रकारचे ढग, पुरेशी आर्द्रता व अनुकूल वातावरणीय परिस्थिती आवश्यक असते. त्यामुळे भारतीय हवामान विभाग (IMD), भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) तसेच संबंधित तज्ज्ञ संस्थांच्या मार्गदर्शनाखाली त्याची तांत्रिक व्यवहार्यता तपासणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सद्यस्थिती लक्षात घेता, अनुकूल ढग व वातावरणीय परिस्थिती उपलब्ध असल्याची माहिती आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यासह पावसाने दडी मारलेल्या विदर्भ व राज्यातील इतर आवश्यक भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम पाऊस पडण्याबाबत( Cloud Seeding ) तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केंद्रीय आयुष आरोग्य व कडंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे 5 सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अनेक भागांचा दौरा प्रतापराव जाधव यांनी करून पीक परिस्थितीची पाहणी केली

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button