बातमी

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजाराची मदत द्या

जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाची मागणी

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजाराची मदत द्या

जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांना मागणीवजा इशाराचे निवेदन

बुलढाणा…
मायबाप शेतकऱ्यांच्या समोरील संकटांची मालिका संपत नसल्याचं दिसून येत आहे. एकीकडे नुसती आश्वासनांची खैरात राज्य सरकार देत असताना दुसरीकडे निसर्ग देखील शेतकऱ्यांवर कोपला आहे. जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प व अनियमित पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका, उडीद,ज्वारी, व इतर पिके करपली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालसमोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारच लक्ष वेधले.
शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके तसेच मशागतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. आधीच लागवड खर्च वाढलेला आहे. मात्र, पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे संकटात सापडला असून, शासनाच्या तातडीच्या मदतीची गरज आहे.
शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून पंचनामे करावेत व कोणतीही अट न ठेवता सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या मागणीसह प्रलंबित कर्जमाफीच्या दुसऱ्या याद्या जाहीर करण्यात याव्यात. पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी. यावर्षीचा पीक विमा ताबडतोब वितरित करण्यात यावा. लोड शेडिंग बंद करून पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी मुबलक वीजपुरवठा, डीपीची उपलब्धता, विद्यार्थ्यांना फी माफी तसेच ई-पिक पाहणी तातडीने पूर्ण करावी सोबत पशुधनासाठी चारा छावण्यांचा विचार अग्रक्रमाने व्हावा. सध्याच्या वाढत्या महागाईच्या आणि शेतीच्या वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत अपुरी ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर अधिक आर्थिक आधार मिळावा यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम वाढविण्याबाबत केंद्र शासनाकडे ठोस शिफारस करण्यात यावी.
अशी देखील मागणी करण्यात आली. या मागणीच्या अनुषंगाने तात्काळ निर्णय शासनाने घ्यावा अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला.
यावेळी जिल्हा समन्वयक गजाननभाऊ धांडे, उपजिल्हाप्रमुख लखनभाऊ गाडेकर, युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे, किसानसेना उपजिल्हाप्रमुख गजाननभाऊ उबरहंडे , बुलढाणा तालुकाप्रमुख विजयभाऊ इतवारे, मोताळा तालुकाप्रमुख विजयभाऊ इंगळे, किसानसेना तालुका प्रमुख गणेशभाऊ रिंढे, बुलढाणा शहरसंपर्कप्रमुख सुनीलभाऊ भाग्यवंत, विधानसभा संघटक सुनीलभाऊ घाटे, धामणगांव बढे शहरप्रमुख रामशंकरभाऊ सोनूने, शहरप्रमुख विजयभाऊ राऊत, उपतालुकाप्रमुख विधानसभा रविंद्रभाऊ पवार, किसानसेना उपतालुकाप्रमुख संजयभाऊ गवळी, शे. रफिक शे.करीम, उपतालुकाप्रमुख मोताळा बळीरामभाऊ जाधव, युवासेना तालुकाप्रमुख संजयभाऊ शिंदे, तालुका संघटक शामभाऊ सावळे, मोताळा उपतालुकाप्रमुख सामाजिक न्याय आघाडी अनिलभाऊ सुरडकर, राहुलभाऊ जाधव (युवासेना उपतालुकाप्रमुख),गजाननभाऊ गवई (उपशहरप्रमुख बुलडाणा ),संजयभाऊ शिंदे ( युवासेना तालुकाप्रमुख ),अनिकेत गवळी (युवासेना शहरप्रमुख बुलडाणा ) सुनिलभाऊ टेकाळे (विभागप्रमुख), शालिग्रामभाऊ सोनुने (शाखाप्रमुख), बबनभाऊ खरे (अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख ),शे. मुजम्मिल अल्पसंख्यांक आघाडी उपतालुकाप्रमुख बुलढाणा, श्रीकांतभाऊ जाधव(सामाजिक न्याय आघाडी उपतालुकाप्रमुख) बाळूभाऊ भऱ्हाड(उपविभाग प्रमुख )विजयभाऊ पाटील, शेषरावभाऊ जावळे, अब्दुल्लाजी पठाण, विजयभाऊ सोनोने, समीरभाऊ खाटीक, रामेश्वरभाऊ शिंदे, राजूभाऊ बोरसे, शेषरावभाऊ बुधवत,अमोलभाऊ बंडे,शांतीनाथभाऊ अपार, श्रावणभाऊ बोरकर, रविंद्रभाऊ गोरे, संतोषभाऊ राजपुत, विश्वनाथभाऊ गरड, विलासभाऊ राऊत, सतीशभाऊ देवकर, , गजाननभाऊ बोडखे, दीपकभाऊ गुळवे, कृष्णाभाऊ सिनकर, अविनाशभाऊ मघाडे, बबनभाऊ चिकटे,प्रभाकरभाऊ माघाडे, प्रवीणभाऊ खरात, , अनिलभाऊ बेंडे, अनिलभाऊ राजपूत, मुख्तार शाह गुलाब शाह, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख अनिताताई जाधव, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख भावनाताई पाटील, स्मिताताई वराडे, रोशनीताई गरड, स्वातीताई लोंढेकर, सुनिताताई दराखे, वैशालीताई मिसाळ, सविताताई राऊत, रुपालीताई चव्हाण, शारदाताई दाभाडे, पुजाताई शिंगणे, सुनिताताई सुरडकर, बेबीताई परिहार, भारतीताई डागोर, सुरेखाताई कदम, निताताई चव्हाण, यशोदाताई देशमुख, वंदनाताई मेढे, ज्योतीताई गायकवाड, रुक्मिणीताई सिरसाठ यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button