बातमी

बुलडाणा जिल्हयातील नवीन 33 रस्त्यांना दर्जान्नत ग्रामीण मार्ग अंतर्गत मान्यता …,!

*"ब"वर्ग तिर्थक्षेत्र विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात केली चर्चा....

*बुलडाणा जिल्हयातील नवीन 33 रस्त्यांना दर्जान्नत ग्रामीण मार्ग अंतर्गत मान्यता …,!

 

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घेतली साडीच्या भेट

 

*”ब”वर्ग तिर्थक्षेत्र विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात केली चर्चा….

बुलडाणा (प्रतिनिधी )
ग्रामीण भागातील रस्त्यांना जोडून दळणवळणाची सेवा सुविधा नागरिंकापर्यंत पोहचविण्याच्या दृष्ट्रिकोनातून ग्रामीण मार्ग रस्ते विकास योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्हयातील नवीन 33 रस्त्यांना दर्जाउन्नोत करण्यास राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने मान्यता दिली असुन या संदर्भात शासननिर्णयही निर्गमित झाले आहे. बुलडाणा जिल्हयातील रस्ते विकासाला मान्यता दिल्याबद्दल आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सदिच्छा भेट घेवून समाधान व्यक्त केले. व बुलडाणा जिल्हयातील” ब ” वर्ग तिर्थक्षेत्र विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात चर्चा केली.
चांगले रस्ते हे देशाचा विकासाच्या दृष्ट्रिकोनातून महत्वपूर्ण आहेत. चांगले रस्ते या विकासाच्या धमन्या म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातून जनतेच्या विकासाठी मुलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम रस्ते विकासाच्या माध्यमातून केले जाते. बुलडाणा जिल्हयातील लोणार तालुक्यातील ग्रामीण महामार्ग 133 अंतर्गत् आरडव ते मुख्यरस्ता ते अढाव मुख्य रस्ता , हत्ता ते पिंप्री खंडारे रस्ता, सिंदखेड राजा तालुक्यातील मौजे चांगेफळ ते बोराखेडी गंडे रस्ता, चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज ते खैरव फाटा रस्ता, खंडाळा मकरध्वज ते गोद्री एमआयडीसीला जोडणारा रस्ता, बुलडाणा तालुक्यातील घाटनांद्रा ते उबरखेड रस्ता, अंभोडा ते तांदुळवाडी रस्ता, चिखला ते झरी रस्ता, धाड ते मोहोज रस्ता (जुनी पांदी रस्ता), अंत्री तेली ते केळवद शिवार रस्ता, साखळी खुर्द ते तांदुळवाडी जोडणारा रस्ता, अशा एकूण 36.50 कि.मीच्या दर्जान्नत करावयाच्या ग्रामीण मार्ग नवनिर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय 3 ऑगस्ट रोजी निर्गमित झाला आहे.
तर मेहकर तालुक्यातील मादणी ते पिंपरपाधी रस्ता, मादणी ते लेहणी रस्ता , मादणी टि पांईट ते मौंढाळा रस्ता, मादणी ते वडजी रस्ता, लेहणी शिव ते बेलजाई महादेव मंदिर रस्ता, मौजे कल्याणा ते नेमतापुर रस्ता, अंत्री देशमुख ते तुरखेड रस्ता, अंत्री देशमुख ते बोरखेडी रस्ता, वर्दडी वैराळ ते महोदरी रस्ता, वर्दडी वैराळ ते आनंदवन महादेव खोरी रस्ता, नांद्रा नजीक चायगांव ते कळपविहिर रस्ता, मौजे नांद्रा चायगांव ते सायाळा रस्ता, मौजे पेनटाकळी ते कासारखेड रस्ता, पेनटाकळी ते कंळबेश्वर धरणापर्यंत रस्ता, मौजे उसरण ते नागझरी रस्ता, बाभुळखेड ते उसरण फाटा रस्ता, थार ते धानोरी रस्ता, डोणगांव ते लांडेवाडी रस्ता, डोणगांव ते आंध्रुड रस्ता, डोणगांव ते नागापूर रस्ता, नांदूरा तालुक्यातील खंडाळा फाटा ते खडदगांव रस्ता, पिंपळखुटा धांडे ते लोणवाडी रस्ता, तरवाडी ते मेंढळी रस्ता, अशा एकूण जिल्हयातील 33 ग्रामीण रस्त्यांना दर्जान्नत करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वतीने प्रा.सचिन जाधव व चंद्रकांत काटकर यांनी ग्रामविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे जिल्हयात 95.00 कि.मी.च्या नवनिर्मित रस्त्यांना दर्जान्नती रस्त्यांना मान्यता मिळाली आहे. आज 25 ऑगस्ट रोजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे मुंबई दौऱ्यांवर असतांना मंत्रालयात जावून त्यांनी ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी बुलडाणा लोकसभा मतदार संघातील विकासात्म्क कामावर चर्चा केली सोबतच ब दर्जा तिर्थस्थळ विकासाच्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात चर्चा करुन मागणीपत्र सादर करण्यात आले.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button