राजकीय बातमी

कृतज्ञता मेळावा संपन्न.. इमानदार कार्यकर्त्यांचा विजय आ. संजय गायकवाड

कृतज्ञता मेळावा संपन्न.. इमानदार कार्यकत्र्याचा विजय : आ. संजय गायकवाड

“कृतज्ञता मेळाव्यात आ.संजय गायकवाड यांनि भावनिक होवून केल्या भावना मोकळ्या”

बुलडाणा

विधानसभा निवडणूकीत विरोधी उमेदवाराकडून पैशाचा प्रचंड दुरपयोग करण्यात आला. शिवाय सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्र येवून आपल्या पराभवाची षडयंत्र रचली. तरी देखील इमानदार व सच्चा कार्यकत्र्यांच्या जोरावर आपला विजय झाला. अशा भावनिक उद्गार आ. संजय गायकवाड यांनी व्यक्त केल्या.

बुलडाणा तसेच मोताळा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकत्र्यांचा कृतज्ञता मेळावा स्थानिक धाड नाका येथील ओंकार लॉन्स याठिकाणी आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्याला मतदार संघातील हजारो पुरुष व महिला कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना आ. संजय गायकवाड यांनी सांगितले की, आपण मागील अडीच वर्षात आगळा वेगळा व सर्व जातीधर्मांना सोबत घेवून निपक्षपणे विकासकामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. भविष्यात देखील मागील अडीच वर्षात अपुर्ण राहिलेला विकास पुर्ण करायचा आहे. त्यामध्ये टेक्सस्टाइल पार्क, फुडपार्क, बेरोजगारीचे प्रश्न, सिंचनाची क्रांती घडवणारा बोदवड सिंचनप्रकल्प, शेतक-यांचे प्रश्न यासह विविध विकास कामांना लवकरच पुर्ण केल्या जाईल, अशी ग्वाही देखील आ. संजय गायकवाड यांनी यावेळी दिली. तसेच भविष्यात होवूघातलेल्या जिल्हा परिषद, नगर पालिका, बाजार समित्या यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये निष्ठावान व होतकरु कार्यकर्ते यांना संधी देवून बळ निर्माण करणे हे ध्येय भविष्यात राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मोठ्या गावात कार्यकत्र्यांनी शाखेच्या माध्यमातून तेथील जनतेची कामे करावी. दुर्दैवाने आपला पराभव झाला असतातरी आपण सच्चा कार्यकत्र्यांसाठी लढत राहिलो असतो, असेही त्यानी यावेळी सांगितले. आपल्याला पडलेली 92 हजार मते ही मते फिक्स असून विरोधकांच्या पक्षाचा भविष्यात काय भवितव्य राहिल हे सांगता येणार नाही. कार्यकत्र्यांनी घमेंडी न राहता जणतेची कामे करुन जनतेशी आपुलकीने वागून भविष्यातील रणनीती आताच आखून ठेवावी. संघर्षशील कार्यकत्र्यांच्या साथीने भविष्यात पक्षाचे कार्य विरोधी पक्षाचा भोंगा वाजविल्या शिवाय राहणार नाही, असेही आ. संजय गायकवाड यांनी सांगितले. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचलन प्रा. अनिल रिंढे यांनी केले. यामेळाव्याच्या यशस्वीतेसाठी युवासेनेचे राज्यसमन्वयक कुणाल गायकवाड व धर्मवीर फाऊंडेशनचे पृथ्वीराज गायकवाड, मेळाव्याला जिल्ह्यातील जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button