बातमी

जून्या रूढी परंनपरेला फाटा देऊन संकट काळी आर्थीक मदतीचा हात देऊन दानपरिमीता करावी- पत्रकार बाबासाहेब जाधव

जून्या रूढी परंनपरेला फाटा देऊन संकट काळी आर्थीक मदतीचा हात देऊन दानपरिमीता करावी- पत्रकार बाबासाहेब जाधव

बुलडाणा,(प्रतिनिधी)- आज रोजी समाजात प्रेमा पोटी ज्या जून्या रितीरीवाज जे पीढीन पीढ्या चालू आहे त्या बंद कराव्या समाजासाठी आपणांस काही देणे घेणे असते हा विचार घेऊन जर भगवान गौतम बुध्दाचा दानपरिमितेच्या संदेशावर चालालतर आपणांस मानसिक आत्मीक समाधान लाभते म्हणून प्रत्येक व्यक्तीने दवाखाण्यात जातांना मित्र-नातेवाईकांनी आपल्या रूगणांना आर्थिक सहाय्य दिल्यास, त्यांना औषध खरेदी करणे, उपचार करणे यासारख्या आवश्यक गोष्टीत सुसहाय्य लाभेल. एकमेकांनी आर्थिक मदत केल्यास रूग्णांच्या कुटूंबाचा काहीसा मानसिक ताण कमी करू शकतो. यामुळे कुटुंबाला मानसिक दिलासा मिळेल,त्यांच्या आर्थीक अडचणीमध्ये थोडा हातभार लागेल म्हणून आपल्या कडून फळा पेक्षा “ फुल नाही फुलाची पाकळी “ म्हणून अडचणीत असलेल्या रूगणाच्या नातेवाईकास मदत मिळेल. सर्वांनी एक विचार करावा की, आपण आपल्या मित्र-नातेवाईकांना भेटायला जातांना त्याला फळे व इतर वस्तू न नेता आर्थीक मदत करावी त्याच्या आर्थीक अडचणीत सहभागी व्हावे.
तसेच आजही समाजात अनेक जून्या परंपरा आहे वाढदिवसाच्या दिवसी आपण निरउपयोगी वस्तूने त्यांचा सत्कार करतो, त्या निरउपयोगी वस्तूंवर( बॅनर,हारतूरे, शाल श्रीफळ) यावर आर्थिक खर्च न करता तो खर्च “ ज्याच्या पोटात नाही त्याच्या पोटात घालून “ निराधार, गोरगरीब, होतकरू यांना आर्थीक मदतीचा हात देऊन साजरा करावा व त्यांच्या जीवनात आनंद फुलवावा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्या जीवनात आनंद देईल.
लग्नात, सुखदुःखत प्रसंगी प्रत्येक नातेवाईक मित्र मंडळी कपड्याचे आहेर,भेट वस्तू न आनता आर्थीक मदत करून त्यांच्या सुखदुख:त सहभागी व्हावे कारण तो मानुस पहीलाच आर्थीक संकटांसी समान करीत असतो.
त्यांचे संकट कपडे व वस्तू देवून त्यांचे सकंट दुर होणार नाही त्यांना आज रोजी जी गरज आहे ती आर्थीकतेची ती गरज ओळखून मित्र-नातेवाईकांनी मदतीचा आर्थीक हात देऊन त्यांच्या संकटात खारीचा वाटा उचलवावा व ह्या जून्या चालू असलेल्या रूढी परंपरा बंद करावी व त्या कुटुंबाला दानपरिमितेच्या माध्यमातून आर्थिक मदत करावी असा विचार सामाजीक कार्यकर्ते पत्रकार बाबासाहेब जाधव बुलडाणा यांनी स्मृतीशेष अरूण भिमराव वाघमारे यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात विचार मांडले.
हा संदेश हा विचार समोर ठेवून सामाजीक कार्यकर्ते रिपाई आठवले बुलडाणा जिल्हासंपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव व त्यांच्या पत्नि विमल बाबासाहेब जाधव या दापंत्यानी प्रत्यक्षात अंगी उतरून १० जानेवारी २०२५ रोजी संभाजीनगर (औरंगाबाद) येथील स्मृतीशेष अरूण भिमराव वाघमारे यांचे ४ जानेवारी २०२५ ला दुःखत निधन झाले व त्यांचा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम १० जानेवारी २०२५ ला संभाजीनगर (औरंगाबाद) मधील सौजन्य नगर मध्ये होता त्या पुन्यानुमोदन कार्यक्रमात कपड्याचा आहीर भेट वस्तू न देता त्या जून्या रूढी परंपरेला तीलांजली देवून त्या कूटूंबाला पाच (५०००) हजार रूपयाची आर्थिक मदत त्यांच्या पत्नी त्रिशला अरूण वाघमारे यांना पूण्यनुमोदन कार्यक्रमात पज्य भंतेच्या उपस्थीत असलेल्यांन समोर दानपरिमितेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली व हा स्वत: कृतीत आणून हा संदेश समाजा समोर दिला. ज्याला पटला असेल त्यांनी घ्यावा नसेल पटेल तर त्यांनी घेवू नये हा संदेश माझा वयक्तीक आहे.“ महाकरूणीक भगवान गौतम बुध्दाचा दानपरिमीता “ संदेश देवून पुण्यनुमोदन कर्यक्रमात स्मृतीशेष अरूण भिमराव वाघमारे यांना अखेरची भावपूर्ण श्रध्दांजी,आदरांजली त्यांनी वाहीली .

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button