बातमी

वान विचारांचे , दान पूस्तकांचे*… *सुहासिनींनी दिले विधवांना धनधान्य व पुस्तकांचे वा

बुलढाण्यातील मानस फाउंडेशनचा उपक्रमच वेगळा

*वान विचारांचे , दान पूस्तकांचे*…

*सुहासिनींनी दिले विधवांना धनधान्य व पुस्तकांचे वान !*

*बुलढाण्यातील मानस फाउंडेशनचा उपक्रमच वेगळा*

*बुलडाणा*

*तीळ संक्रातीला महिला वाण देतात. विविध बियाणे,फळांच वाण देऊन एकमेकींना भेटतात. मात्र बुलढाण्यात पुस्तकांचे वान देऊन महिलांनी तीळ संक्रांत साजरी केली.वाण विचारांचे… दान पुस्तकांचे हे ब्रीद घेवून माणस फाउंडेशनने हा आगळा वेगळा उपक्रम राबविला. विशेष बाब म्हणजे विधवा महिलांना पुस्तके देऊन त्यांनाही या कार्यक्रमात सहभागी करण्यात आले. त्यामुळे आयोजित कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरला आहे.*

*तीळ संक्रांत हा महिलांचा आवडीचा सण. या दिवशी महिला एकमेकींना वान देतात. शेकडो वर्षापासून ही परंपरा चालत आली आहे. तिळासोबत गुळाचा गोडवा ही चाखायला मिळतो. याच दिवशी एकमेकांशी गोड बोलण्याची हमी घेतली जाते. तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणतात. मात्र मानस फाउंडेशन ने तिळगुळा सोबतच पुस्तकांचे वाण देऊन विधवा महिलांसोबतही गोड बोला हाच संदेश या कार्यक्रमातून दिला. शिवसाई ज्ञानपीठ तुलसी नगर बुलढाणा येथे दुपारी बारा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाने व मानस फाउंडेशन चे सर्व कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. कार्यक्रमासाठी विधवा व सवाष्ण महिला दोघांनाही निमंत्रित करण्यात आले. यावेळी सवास्त महिलांनी विधवांना कुंकू लावून पुस्तकांचे वाण दिले. अशा कार्यक्रमांमध्ये विधवा महिलांना दूर ठेवल्या जाते त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. मात्र बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रम हा विधवांना सन्मान देणारा ठरला.*

*विधवांचा सन्मान होणे गरजेचे -प्राध्यापक डी एस लहाने*

*विधवा महिलांना पती सोडून गेल्यानंतर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातच समाजाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर त्यांच्या जीवनाची होरपळ होऊन जाते. त्यासुद्धा समाजाचा घटकच आहे हे स्मरणात ठेवून आपण त्यांना बंधू भावाची वागणूक दिली पाहिजे,असे मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाने यावेळी बोलतांना म्हणाले. तर प्राचार्य शहीनाताई पठाण,पत्रकार गणेश निकम , प्रतिभा भुतेकर अनीता कापरे, ज्योती पाटील, मनीषा वारे प्रज्ञा लांजेवार मीना लहाने अलका साबळे यांनी यावेळी विचार व्यक्त केले. संदीप जाधव, गौरव देशमुख व शिवशाही परिवारातील सदस्यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाला परिसरातून शेकडो महिलांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये विधवा महिलांची संख्या लक्षणीय होती.*

*विधवांच्या हाती ताराबाईचे पुस्तक*

*स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहून ताराबाई शिंदे यांनी महिला समतेची हाक दिली. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला ताराबाईंनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहून खळबळ उडवून दिली दिली. पुरुषप्रधान व्यवस्थेला खड्या आवाजात प्रश्न करून ताराबाई शिंदेनी महिलांची कैफियत मांडली. ताराबाईंनी लिहिलेला हाच निबंध वाण म्हणून महिलांना देण्यात आला. ताराबाईंचे शेकडो पुस्तके आणून सवाष्ण महिलांनी विधवा महिलांना ही वैचारिक भेट दिली. त्यामुळे तीळ संक्रांतीचा हा कार्यक्रम वैचारिक पेरणी करून गेला.*

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button