आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतली विकास आराखडा आढावा बैठक
सर्वसामान्य जनतेचे कामे तत्परतेने मार्गी लावा तक्रारींचे निवारण करा - आमदार सिद्धार्थ खरात

आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतली विकास आराखडा आढावा बैठक
सर्वसामान्य जनतेचे कामे तत्परतेने मार्गी लावा
तक्रारींचे निवारण करा – आमदार सिद्धार्थ खरात
मेहकर /प्रतिनिधी:
आपण सर्वजण जनतेचे सेवक आहोत. येणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे कामे तत्परतेने मार्गी लावा, त्यासाठी सर्वांनी सकारात्मक भावना ठेवाव्यात. आलेल्या तक्रारींचे निवारण सकारात्मकतेने करा,असे निर्देश आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर लोणार विकास आढावा बैठकित दीले.
मेहकर येथील हॉटेल के व्ही प्राईड येथे पहिल्यांदाच मेहकर लोणार मतदार संघातील विकास कामांची तालुका स्तरीय आढावा बैठक आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षते खाली घेतली. मतदार संघातील विकास आराखड्यासंदर्भात आमदार सिद्धार्थ खरात यांनी आढावा बैठक घेतली.बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोहन,गटविकास अधिकारी उमेश देशमुख,शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे तालुका अध्यक्ष निंबाभाऊ पांडव, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, मेहकर शहर अध्यक्ष किशोर गारोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय घनवट, नारायण बळी,विजय मोरे,ॲड. संदिप गवई, जीवन घायाळ, अमोल बोरे,गजानन मोरे,परमेश्वर दहातोंडे श्रीकांत नागरे राजू बुधवत, विजय लोखंडे,श्री लहाने,भागवत बोरकर,उपस्थित होते.
आढावा घेतल्यानंतर आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की या वेळी आपली पहिलीच बैठक आहे, पुढच्या वेळी सर्वांनी चांगली तयारी करून यावे, आपल्याला मेहकर लोणार मतदार संघ हा विकासाच्या बाबतीत नंबर एक वर आणायचा आहे, आपल्याला जर खरच काम करायचे असेल तरच येथे काम करा मरगळ झ्टकुन टाका ज्यांना जनतेची कामे करायची नसतील त्यांनी इतर तालुक्यात जावे अशी तंबी सुद्धा दिली.इथल्या टीमने चांगलं काम करावे जो कोणी चांगलं काम करेल त्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल,असे आश्वासन आमदार खरात यांनी दिले आहे. ग्राम स्तरावरील कृती आराखड्यातील कामे प्राधान्याने अंमलबजावणी करावी. सर्वसामान्य जनतेचे कामे करण्यासाठी आपण शासकीय नोकर आहोत. त्यांचे सेवक आहोत त्यामुळे सकारात्मक विचार करुन, येणाऱ्या जनतेची कामे झाली पाहिजेत,हे सर्वांनी लक्षात ठेवावे. मेहकर लोणार मतदार संघ हा विकासा पासून वंचित आहे, लोक त्रस्त आहेत,जनतेची कामे अडलेली आहेत, विकास कामे रखडलेली आहेत, जलजिवन मिशन अंतर्गत कामांचा नुसता बट्ट्याबोळ झालेला आहे, लोकांना पिण्यासाठी पाणी नाही,रस्ते नाही,शेतकऱ्यांना विज पुरवठा दिला जात नाही, अनेक गावांचे खड्डे सुरक्षित नाही त्या मुळे बस धावत नाही,शाळकरी मुले मुली दहा दहा किलोमीटर पाई जात आहेत, जागतिक पातळीवरील पर्यटन केंद्र लोणार सरोवर आहे मात्र लोणार विकास आराखडा हा भकास झालेला आहे तेथे कोणतेही कामे झालेली नाहीत. त्या मुळे आपल्या सर्वांच्या सहकार्याने लोणार चा लोणावळा आपल्याला करायचा आहे, बरीच विकास कामे करायची आहे अशी भावनिक साद घालत अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप मेटांगळे, आभार दत्ता मगर यांनी मानले



