बातमी

जयश्रीताई शेळकेंनी सरकारला घेतले फैलावर

केसगळती प्रकरण: सेलिअम घटक असलेला गहू जप्त करुन चांगला गहू वितरण करण्याची मागणी

जयश्रीताई शेळकेंनी सरकारला घेतले फैलावर
* केसगळती प्रकरण: सेलिअम घटक असलेला गहू जप्त करुन चांगला गहू वितरण करण्याची मागणी

बुलढाणा प्रतिनिधी :
जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडालेल्या केस गळतीची केस गांभीर्याने घ्यायला तयार नसल्याने उबाठाच्या नेत्या ऍड. जयश्रीताई शेळके यांनी राज्य सरकारला चांगलंच फैलावर घेतलंय. जर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे वाटण्यात येणाऱ्या गव्हामध्ये सेलेनियम हा विषारी घटक असेल तर अजुन त्या गव्हाची वाटप का थांबवण्यात आली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यातील केस गळती प्रकरण हे गंभीर असुन राज्य सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे जयश्रीताईंनी म्हटले आहे. देशाच्या सर्वोच्च वैद्यकीय संशोधन पथक ICMR ने या परिसरात येऊन रुग्ण तपासणी करून रुग्णांचे व परिसरातील अनेक नमुने तपासण्यासाठी दिल्ली, भोपाळ व चेन्नई येथे नेले होते. त्याचा अहवालही अजुन आला नाही.
ज्येष्ठ संशोधक डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी संशोधनातून काढलेला निष्कर्ष राज्य सरकारने गांभीर्याने घेऊन तातडीने सावधगिरीचे पाऊले उचलणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील ज्या गावात हा गहू पोहोचला आहे तो गहू त्वरीत जप्त करून चांगल्या दर्जाच्या गव्हाचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी जयश्रीताई शेळके यांनी केली आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button