चिखलीतील तरुण सट्टा बाजार खेळताना विदेशात अटक…
चिखलीतील तरुणाचे थेट विदेशात कलेक्शन.. जिल्ह्यात एकच खळबळ...

चिखलीतील तरुण सट्टा बाजार खेळताना विदेशात अटक…
चिखलीतील तरुणाचे थेट विदेशात कलेक्शन.. जिल्ह्यात एकच खळबळ…
जेव्हा मोबाईलचे व्यसन तरुणांना नव्हते तेव्हा हेच तरुण आपल्या शिक्षणानंतर भविष्याबद्दल चिंतीत दिसायचे. पुढे काय.? हा प्रश्न त्यांच्या समोर असायचा आणि यातून ते विविध स्पर्धा परिक्षेच्या तयारीत लागायचे, मैदानावर घाम गाळायचे. कुठं प्रायव्हेट नोकरी मिळावी म्हणून त्याला लागणारे सर्व कोर्स करायचे. टाइपिंग चे क्लासेस, एमएससीआयटी सारख्या कोर्स करण्यासाठी झुंबड उडायचे. परंतु आता हा प्रकार नगण्य झाला असून कमी कालावधीत जास्त पैसे कसे मिळतील याबद्दलचे असंख्य धडे मोबाईलच्या विध्यापिठात मोफत मिळायला लागले तेव्हा पासून मैदानावर घाम गाळणार हाच तरुण बाम मार्गाकडे वळतो आणि होत्याच नव्हतं करून बसतो. आणि हा सर्व प्रकार सुरू असताना मुलांचे भविष्य सोन्यासारखे होण्याचे स्वप्न पाहणारा पालक मात्र गप्पगुमान पडून राहतो, हेच नवल करण्यासारखे आहे. या संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकणारा हा एम एच 28 न्यूज लाईव्ह चा विशेष वृत्तांत पहा बुलढाणा क्राईम डायरीमध्ये.
मागास समजल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली सारख्या छोट्या शहरात काय नाही ते बोलाव.. क्रिकेट सट्टा, क्लब, वरली मटका हे सुरूच आहे. जरी यांचे बागणे मांजराप्रमाणे असेल तरी सर्वांना ते दिसतेच. हे सुरू असतांना मात्र चिखली मधील तरुणावर चक्क आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हे दाखल करून अटक करून तुरुंगाची हवा खाण्यास भाग पडणे, ही गोष्ट खरच चिता वाढवणारी आहे. हा प्रकार जेव्हा झाला तेव्हा यात दोषी कोण ? तर यात त्या भविष्याचे वेध घेणारे तरुणच दोषी नसून पालकवर्ग सुद्धा दोषी असून यासोबतच वैधील समाजजन सुद्धा आहेच…

दि. ११ जून २०२४ रोजी थाईलैंड मधील पटाया येथे तेथील चोनब्री प्रातीय पोलिसांनी सोई सुखुमवित ९१/२ मधील एका घरावर छापा मारून ऑनलाइन पद्धतीने चालणाऱ्या जुगार अड्डा चालयणान्या २१ भारतीय लोकांना अटक केली, या मध्ये १०० मिलियन थाई किंवा यापेक्षा अधिक रकमेचा घेवाण देवाण चे पुरावे तेथील पोलिसानी हस्तगत केले.

५० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी जेव्हा या घरामध्ये चाखल आले तेव्हा १० भारतीय लोक हे संगणकावर बैकारेट, पोकर, स्लॉट आणि खेळ जुगारासह विविध ऑनलाइन गेमिंग बद्दल फोन कॉलिंग करत असल्याचे दिसून आले. यावेळी याच घरातील बरच्या मजल्यावर काही तरुण आराम करत असल्याचे पोलिसांना आढळले. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले सर्व २१ तरुण हे भारतीय होते. यातील काही तरुणाकडे शैक्षणिक आणि पर्यटक व्हीजा होता तर इतर तरुणांकडे पासपोर्ट सुद्धा नव्हते. तर पटाया पोलिसांनी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात साक्ष सुद्धा जमा केले. ज्यामध्ये चार डेस्कटॉप कंप्युटर, आठ लैपटॉप, ५० पेक्षा अधिक मोबाईल फोन, असख्य थाई सिम कार्ड, आणि तेथील भितीवर भारत, सयुक्त अरब अमिरात (दुबई) आणि थाईलैंड चा वेळ दाखवणारी तीन घडयाळी लावलेल्या होत्या. सोबतच तेथील भिंतीयत हिंदी भाषेत हाताने लिहिलेल फलक होते ज्यामध्ये करावयाच्या कामाबद्दलची माहिती, विविध बँकाचे अकाउंट नंबर आणि जुगाराचे नियम आदी लिहिलेले होते. तर प्राथमिक चौकशी मध्ये पोलिसांना माहिती मिळाली की, ऑगस्ट २०२३ मध्ये ३० हजार थाई रुपयांमध्ये ते घर भाड्याने घेण्यात आले होते. तर यांचे काम फिलिपिन्स मध्ये स्थित सात ऑनलाइन पद्धतीने चालणाऱ्या जुगारच्या वेबसाईटसाठी पैसे हस्तातरण ची जबाबदारी साभाळून त्यासाठी कॉल सेंटर सुद्धा चालायचे. तर यांमध्ये बहुतांश ग्राहक हे भारतीय होते तर काही दुबई चे होते. इथे प्रत्येक व्यक्ती हा आठ तास काम करायचा. तेथील पोलिसाच्या माहितीनुसार काही लोक न्यायिक पद्धतीने थाईलैंड मध्ये दाखल झाले होते तर अनेकांच्या पासपोर्ट ची अवधी समार झाल्यानंतर देखील ते तेथे वास्तव्यास होते. तर छापा टाकला तेव्हा काही संशयित तेथून चोनबुरी मध्ये फरार होण्यात यशस्वी झाले. यावेळी सर्व संशयित लोकाची नावे तेथील प्रसासनाने काळ्या यादीत नावे समाविष्ट करून तेथून निर्वासित केले.
हा सर्व प्रकार जेव्हा धाईलैंड मधील पटाया न्यूजच्या माध्यमातून समोर आला तेव्हा सर्वांत मोठा धक्का बसला, जेव्हा कळले की, अटक करण्यात आलेल्या २१ भारतीय लोकांमधील काही तरुण हे चिखली मधील असल्याचे काही लोकांनी स्पष्टपणे सांगितले. ऐन तारुण्याच्या उबरठ्यावर त्याच्यावर आतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हे दाखल होऊन तुरुगात जावे लागले यात दोषी कोण – कोण? हे माहिती सुद्धा विस्तृतपणे समोर येईलच. मात्र, चिखली सारख्या छोट्या शहरातून निघून विदेशात आपले बस्तान मांडण्याच्या स्वप्नापाई आज ते तरुण आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हेगार म्हणून समोर आले असून त्याची सुटका कधी व केव्हा होणार ? तसेच भारतात आल्यावर त्याचे काय ? हाच मोठा यक्ष प्रश्न समोर येत आहे. तर सहा इंचाच्या मोबाईलमध्ये सामावलेले जग शोधत असताना आपले मूल वाममागनि तर जात नाही ना ? याबद्दलची खात्री करणे आज प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. कमी कालावधीत पैसे कमावण्याचे त्याचे स्वप्न योग्य की अयोग्य हे वेळीच त्याना समजवणे महत्वाचे आहे. जे तरुण आज तेथे अटकलेले आहेत त्यांचे पालक चिंतातुर आहेत. पण आपला मुलगा पैसे कुठून, कसा आणत आहे याबद्दल साधी विचारपूस करणे महत्वाचे होऊन बसते. त्या मुलाने अमाप पैसा कमवला यापेक्षा अधिक महत्त्वाचे हे आहे की, अमाप पैश्यापेक्षा अधिक प्रिय प्रत्येक पालकाला आपले पाल्य असतात आणि तो कसाही जरी असला तरी तो डोळ्यांसमोर असावा, हे महत्वाचे आहे. तूर्तास एवढेच !



