बातमी

१२ मे बुध्द पोर्मिमेला बुलडाणा येथे भव्य धम्म शांती परिक्रमा (रॅली) 

बुलडाणा,(प्रतिनिधी)- बुलडाणा शहरातील समस्त उपासक उपासिका यांना कळविण्यात येते की, महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या २५८७ व्या जयंतीच्या निमित्ताने भव्य धम्म शांती परिक्रमा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

कपिलवस्तूचे महाराजा शुध्दोधन व महाराणी महामाया यांच्या पोटी इसवी सन पूर्व ५६३ मध्ये लुंबीनी (नेपाळ) येथील शालीवनात वैशाखी पौर्णिमेला राजकुमार सिध्दार्थाचा (गौतम बुध्दीचा ) जन्म झाला.

सहा वर्षाच्या कठोर ज्ञान साधने नंतर राजकुमार सिध्दार्थला उरवेला येथे निरंजना नदीच्या काठावरती बोध्दिवृक्षा खाली(पिंपळवृक्ष) वैशाख पोर्णिमेला बुध्दत्वाची प्राप्ती झाली. बुध्दत्व प्राप्तीमुळेच उरवेला या स्थळाला बोध्दगया आणि ज्या पिंपळवृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली त्या पिंपळवृक्षाला बोध्दिवृक्ष म्हणतात.

बुध्दत्व प्राप्ती नंतर तथागत भगवान बुध्दांनी समस्त मानव जातीच्या कल्याणाकरीता ४५ वर्ष धम्माचा उपदेश केला. वैशाखी पौर्णिमेलाच तथागत भगवान बुध्द यांचे कुशीनगर येथील शालवनात महापरिनिर्वाण झाले.

तथागत भगवान बुध्दांच्या जीवनात घडलेल्या या तीन महत्वपूर्ण घटनांमुळे या वैशाखी पौर्णिमेला त्रिविध पावनी वैशाखी पोर्णीमा म्हणतात.

वैशाखी पोर्णीमा म्हणजेच बुध्द पोर्णीमा ही बौध्द उपासक तथा उपासिका यांच्यासाठी ऐतीहासीक महत्व असलेला दिवस आहे. या निमित्ताने आपल्या बुलडाणा शहरात भव्यदिव्य धम्म शांती परिक्रमा रॅलीचे आयोजन बुलडाणा शहरातील , संबोधी बुध्द विहार, सम्राट अशोक उपासिकासंघ, सावित्रीबाई फुले नगर बुध्द विहार, जागृती उपासिका संघ, महाबोध्दि बुध्द विहार, सारनाथ बुध्द विहार, कपिलवस्तू बुध्द विहार, मातेश्री रमाई आंबेडकर सभागृह, पंचशिल बुध्द विहार, क्रांतीनगर बुध्द विहार, जेतवन बुध्द विहार विदर्भ हाउसिंगसोसायटी, तक्षशिला बुध्द विहार, मैत्रेय बुध्द विहार, जेतवन बुध्द विहार कॅांग्रेस नगर यांनी केले आहे.

सुखो बुध्दानं उप्पादो सुखो सध्दम्म-देसना।सुखो सहस्स सामग्गी समग्गानं तपो सुखो।

बुध्दाचा जन्म सुखकर आहे, सदधम्माचा उपदेश सुखकर आहे. संघाची एकता सुखकर आहे. एकीने वागणाऱ्याचे तपश्चर्या सुखकर आहे.

त्रिविध पावनी १२ मे २०२५ रोज सोमवारला संयकाळी ५ वाजता मलकापूर रोड वरिल डॅा. आंबेडकर नगरचे महापूरूषांचे तीन पुतळे येथून धम्म शांती परिक्रमा रॅलीचा भव्य दिव्य प्रारंभ होणार आहे.

बुलडाणा शहरातील श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक तथा उपासिका सर्वांनी या त्रिविध पावनी वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमेच्या धम्म शांती परिक्रमा रॅली मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावी ही विनंती आयोजकांनी केली आहे.

सर्वांनी शुभ्र वस्त्रात यावे ही नम्र विनंती, वैशाख पौर्णिमा अष्ठशील उपोसथ असल्यामुळे खिर दानाचा कार्यक्रम दुपारी 12 च्या आत प्रत्येक बुध्द उपासकांनी संपन्न करावा व या भव्यदिव्य रॅलीत सहभाग नोंदवून चलो बुध्द की ओर एकसंघ दाखवावे.

असे आव्हाण समस्त बौद्ध उपासक तथा समस्त उपासिका संघ बुलढाणा यांनी केले आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button