बातमी
अन्नदाता संघर्ष पदयात्रेची सांगता ; बळीराजाचे राज्य आणेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही
*भाजपाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे दररोज ८ शेतकरी आत्महत्या : हर्षवर्धनदादा सपकाळ

- अन्नदाता संघर्ष पदयात्रेची सांगता ; बळीराजाचे राज्य आणेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही
*भाजपाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे दररोज ८ शेतकरी आत्महत्या : हर्षवर्धनदादा सपकाळ
जळगाव जा
काँग्रेस आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत केली जात होती. शेतकरी कर्जमाफी करण्यात आली. कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली तरी काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात परंतु २०१४ पासून केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आल्यापासून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. शेतमालाला भाव नाही व दुसरीकडे शेती साहित्य महाग झाल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. महाराष्ट्रात दर तीन तासाला एक तर दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि त्याला सर्वस्वी नरेंद्र व देवेंद्र यांचे सरकारच जबाबदार आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाने मात्र शेतकऱ्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे, बळीराजाचे राज्य आणेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रखरखत्या उन्हात सोमवार ४ मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मानेगाव ते जळगाव जामोद अशी शिवसन्मान शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार, प्रदेश सरचिटणीस रामविजय बुरुंगुले, सरचिटणीस महेश गणगणे, ज्ञानेश्वर पाटील, शेगाव नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार, मलकापूर नगराध्यक्ष अतिक जवारीवाले, सौ. स्वाती वाकेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष सतिश टाकळकर, श्यामभाऊ उमाळकर, लक्ष्मण घुमरे, मंगलाताई पाटील, ज्योती ढोकणे, अॅड. अनंत वानखडे, तेजेंद्रसिंग चव्हाण, रशीद खान जमदार, मीरा मापारी, भूषण मापारी, डॉ. संतोष वानखेडे, संदीपदादा शेळके, अॅड. भाऊराव भालेराव, प्रमोद पाटील, शिवराज पाटील, शैलेंद्र पाटील, जुनेर पाटील, अजहर देशमुख, बाबु जमादार, राजेंद्र वानखेडे, अतुल शिरसाठ, संभाजी शिर्के, अरविंद कोलते, डिंगाबर मवाळ, कासम गवळी, अशोक इंगळे, अजय तायडे, , धनंजय देशमुख, कैलास फाढे, मोहतेशाम रजा, शैलेश खेडेकर, भगवान धांडे, प्रकाश शेगोकार, अतिक जवारीवाले, अंबादास बाठे, देवानंद पवार, हरिष रावळ, जावेद कुरेशी, अमर पाचपोर, गौरव पाटील, गजानन धांडे, प्रल्हाद पाटील, तेजराव मारोडे, रौंदळे सर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदयात्रेच्या सांगता सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापूस, कांदा, तूर, हरभरा, धानाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे, एकीकडे आस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी संकटात तो अडकला आहे आणि देशातील व राज्यातील भाजपा सरकार मात्र शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे नाव आहे, त्याच्या जोरावरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल करत आहेत, मोदी अमेरिकेसमोर सलेंडर झाले आहेत आणि त्यातूनच अमेरिकेबरोबर नरेंद्र मोदींनी दबावाखाली व्यापारी करार केला, त्याचा मोठा परिणाम भारतातील शेतकऱ्यांवर होणार आहे. सूत्रसंचालन पत्रकार रणजित राजपूत यांनी तर आभार अविनाश उमरकर यांनी मानले.
* जनतेसाठी काँग्रेस पक्ष मैदानात होता आणि राहणार : हनुमंत पवार
कुठल्याही निवडणुका नसतांना काँग्रेस पक्ष रखरखत्या उन्हात ४५ अंश तापमान असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरला आहे. कारण फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांना वाचवण्यात कमालीचे अपयशी ठरले आहे. भारत – अमेरिका करारामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार आहेत. शेतकऱ्यांना वाचवता येत नसेल तर मुख्य़मंत्र्यांनी खुर्ची सोडावी. शेतकऱ्यांसाठी, जनतेसाठी काँग्रेस पक्ष मैदानात होता आणि राहणार असा ठाम विश्वास काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी व्यक्त केला.
* शेतकऱ्यांच्या जातीत जन्म घेणे हा गुन्हा आहे का ? : राहुलभाऊ बोंद्रे
अमेरिका ट्रेड डीलमुळे देशातील शेतकरी हा देशोधडीला लागणार आहे. शेतकऱ्यांच्या सध्याच्या दयनीय अवस्थेचे वर्णन करतांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी कवी किशोर बळींच्या ओळीचा आधार घेतला. “जाते जाते राबता राबता अखी जिंदगी मातीत..जणू जन्म घेणे गुन्हा शेतकऱ्यांच्या जातीत…” शेतकऱ्यांच्या जातीत जन्म घेणे, हा गुन्हा आहे, का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हर्षवर्धनदादा नावाचा काँग्रेसचा वाघ भाजपच्या विरोधात सातत्याने रणशिंग फुंकतो आहे त्यांच्या धैर्याचे, लढाऊ बाण्याचे राहुलभाऊ बोंद्रे यांनी कौतूक करत भाजपच्या विरोधात तुम्ही आम्ही मिळून संघर्ष करु, असा एल्गारही फुकारला.



