बातमी

ताब्यातील जमीनीचे कायम पट्टे करा , पालकमंत्री याना निवेदन ..*

_भुमीहीनाच्या मागण्यांचे जिल्ह्यातील पहीले नीवेदन_

*ताब्यातील जमीनीचे कायम पट्टे करा , पालकमंत्री याना निवेदन ..*

_भुमीहीनाच्या मागण्यांचे जिल्ह्यातील पहीले नीवेदन_

बुलढाणा :- अनेक वर्षांपासून पोटाची खळगी भरण्यासाठी शासनाच्या विनावापर ईक्लास वन जमीनीवर भुमीहीन अति दुर्बल घटकातील समुहानी या शासनाच्या जमीनीवर कायदेशीर कब्जा करूण आपला उदरनिर्वाह चालवत आहे . अनेक वेळा सरकारला निवेदन देऊनही सरकार याकडे बघ्याची भुमीका घेताना दिसत आहे .सरकारणे भुमीहीनाच्या ताब्यातील जमीनीच्या मालकीचा मार्ग लवकरच मोकळा करावा अशी विनंती भारतीय समता संघटनेचे अध्यक्ष आम्रपाल भाऊ वाघमारे यांनी निवेदन देताना पालकमंत्र्याना केली आहे .सन 1989 पूर्विपासूनचे अनेक शासकीय जमीन कसनारे शेतरी कायम पट्टे न मीळाल्याने वंचित राहीले आहे .तरी आपण या जिल्ह्याचे पालनहार आसून तात्काळ जमीनीचे पट्टे वाटपाचा निर्णय घ्यावा असी विनंती निवेदनात करण्यात आली आहे .राज्यसरकारणे सौरऊर्जा प्रकल्प हा भुमीहीच्या ताब्यातील जमीनीवर नघेता तो इतर ठिकाणी घेण्यात यावा , आणि ज्या शासकीय जमीन कसनाऱ्या शेतकऱ्यांकडे 1990 अगोदरचे पुरावे असेल अशा शेतकऱ्यांसाठी एक नवीन धोरण जाहीर करून अंपग व्यक्तीला स्वताच्या उपजीविकेसाठी विना अट जमीन त्याना कायम कसन्यासाठी देण्यात यावी अशाअशायाचे निवेदन मा बुलढाणा पालकमंत्री याना देण्यात आले यावेळी शुसिल भाऊ इंगळे ,देवानंद वानखेडे , नितीन कांबळे ,प्रसेजीत जाधव हजर होते ..

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button