विवेकाची पेरणी: उकाड्यातही तीन तास भरगच्च सभा, बुलढाणेकरांचा उत्तम प्रतिसाद…
संतांच्या भूमीत अंधश्रद्धाचे पीक फोफावतेय ....श्याम मानव

विवेकाची पेरणी: उकाड्यातही तीन तास भरगच्च सभा, बुलढाणेकरांचा उत्तम प्रतिसाद…
संतांच्या भूमीत अंधश्रद्धाचे पीक फोफावतेय ….श्याम मानव
बुलडाणा संतांच्या भूमीत विवेकी विचाराच्या ठिकाणी अंधश्रद्धांचे पीक फोफावत असताना शासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. कमिशन खोरी कमालीची वाढली आहे. अंधश्रद्धेच्या कामातही कमिशन हव असते.मुख्यमंत्र्यांनी काही पुण्यकर्म करून राज्याला अंधश्रद्धेच्या गर्तेतून वाचवावे असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. शाम मानव यांनी बुलढाण्यात केले. वृक्ष तेथे छाया,बुवा तेथे बाया …या विषयावर प्रा.मानवांनी जाहीर व्याख्यानातुन विवेकाची पेरणी केली.दिनांक २०एप्रिल रोजी गोवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमाला बुलढाणाकरांचा भरगच्च प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे सीईओ डॉ.अशोक खरात होते. विचारपिठावर प्रमुख उपस्थितीत संदीप शेळके,इंदुमती लहाने ,अंनिसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे,मराठवाडा संघटक किशोर वाघ,जिल्हा संघटक प्रमोद टाले,जिल्हा अध्यक्ष डॉ. मनोहर तुपकर, दत्ताभाऊ सिरसाट,महिला संघटक प्रतिभा भुतेकर ,उपाध्यक्ष स्वाती सावजी,सचिव आशिष गवई उपस्थित होते.अभियानाच्या प्रास्ताविकात सुरेश झुरमुरे यांनी अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देवाधर्माला विरोध नसून त्याच्या नावावर जनसामान्यांची लुबाडणूक करणाऱ्यां दलालांच्या विरोधात जनजागरणाचा लढा गत 44 वर्षापासून सुरु असल्याचे सांगितले. पुढे बोलताना मानव म्हणाले, संत आणि समाज सुधारकांच्या पुरोगामी महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा असताना आज अशोक खरात सारखे भोंदू बुवा बाबा आणि अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या असून त्यास मोठ्या संख्येने स्त्रिया व पुरुष बळी पडत आहे. आजही जनतेचे शारीरिक,मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. याचे कारण फडणवीस सरकारची कायद्याचे जनजागरण आणि अंमलबजावणीत हेतू पुरस्पर केलेली उदासीनता आहे, असे ते म्हणाले.या वेळी प्रा.शाम मानवांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीत कसा खोडा घातला जातो यावर भाष्य केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अशोकराव खरात यांनी जादूटोणा विरोधी कायद्याची पार्श्वभूमी सांगितली.हा कायदा देवा धर्माच्या विरोधी आहे असा समज असल्याने स्त्रिया इकडे येत नाही.वास्तविक कायद्याच्या प्रस्तावनेची कलमे काय सांगतात ती त्यांनी वाचून दाखविली.इतरही वक्त्यांनी समायोचित विचार मांडले. विशेष म्हणजे तापमानाचा पारा वाढलेला असताना गोवर्धन सभागृह खचाखच भरले होते.श्रोत्यांना जागा कमी पडल्याने आयोजकांच्या सुचणे वरून स्टेजवर सुद्धा प्रेक्षक बसले. प्रास्ताविकात डॉ मनोहर तुपकर यांनी भूमिका मांडली, संचालन इतिहास अभ्यासक संजय खांडवे यांनी तर आभार प्रदर्शन ऐतिहासिक ग्रंथप्रेमी प्रमोद टाले यांनी केले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी अभय पाटील,विवेक हिवाळे, सुमेध जाधव, विजय शिरसाठ, गिरीश सरसांडे,गजानन पडोळ अंजली गाढे, करुणा घोडेस्वार, नानाभाऊ मोरे,प्रशांत शिंदे, देविदास वले,नितीन बाहेकर आदींसह बुलढाणा अ.भा. अंनिसने अथक परिश्रम घेतले.



