गॅस सिलेंडर उपलब्द्ध करून घरपोच सुविधा दया शिवसेना जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

गॅस सिलेंडर उपलब्द्ध करून घरपोच सुविधा दया
शिवसेना जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
बुलढाणा
गॅस सिलेंडर उपलब्ध असूनही नागरिकांना देण्यात येत नाही, ती देण्यात यावी, गॅस सिलेंडर घरपोच देण्यात यावे, सर्व डिलेव्हरी कामगाराना रोजगार नसल्यामुळे त्यांचे परिवाराची उपासमार होत आहे, त्यामुळे बुलढाणा गैस सर्व्हिसची चौकशी करण्यात यावी, तसेच व्यवसाईक सिलेंडर उपलब्ध करून देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
बुलढाणा जिल्हा शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष मधुकर जोगदंड मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा बांधकाम कामगार संघटनचे जिल्हा उपाध्यक्ष बबन गादे दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, सर्व कामगार व सामान्य नागरिकाना गॅस सिलेंडर घरपोच मिळत नाही त्यामुळे सामान्य नागरिक गॅससाठी रात्री 2 वाजता लाईनमध्ये लागतात. तरी त्यांना सिलेंडर मिळत नाही. त्यांना वारंवार उन्हातान्हात एजन्सीवर चकरा माराव्या लागतात. त्यांना 8 ते 10 दिवसाने या असे गॅस वितरकाकडून सांगण्यात येते. जेष्ठ नागरिक व महिलाना फार त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकांना अॅटोचे 200 ते 300 रुपयाचा भुर्दड पडतो, कामगाराना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्यामुळे ते रोजगार सोडून एजन्सीमध्ये चकरा मारतात. तसेच सामान्य व्यवसाईक यांच्याकडे काम करणारे कामगार यांची सुध्दा उपासमार होत आहे. आपण आपल्या स्तरावरून सामान्य व्यवसायिकांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात यावे. एछ. पी. व इंडियन गॅस सर्व्हिस मधील डिलेव्हरी कामगार व इतर कामगार व सामान्य ग्राहकांना आपण न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. अन्यथा बुलढाणा जिल्हा शिवसेना बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष मधुकर जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही मार्गाने आंदोलन करू याची आपण दखल घ्यावी, असे आव्हान देण्यात आले. यावेळी निवेदन देताना कैलास कंतीकर, रुपेश वंञोले, प्रशांत ठोंबरे, राजेंद्र कंतीकर, गजानन वाकोडे, शाम भालेराव, अरुण कुंदेटकर, जयंत स्वामी, दिलीप जाधव, पवन केशपागे, मनिश कंतीकर, मनोज कोमले, राजेश निलगिरी, चंद्रकांत लाडके, मुकेश रेड्डी, मधुकर गद्दलकर, संजय येरले, आदील शे. जहागीर, रमेश चंदन, अरुण काळे, मंगेश पाटील यांच्यासह असंख्य नागरीक उपस्थित होते.



