उजव्या बाजूने चालण्यासाठी शहरातून काढण्यात आली वॉकेथॉन रॅली
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जनजागृती साठी शहरात वाकेथॉन घेण्यात आली
या कार्यक्रमाला जो आपण उद्घाटक म्हणून आमदार संजय गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे हे होते रस्त्यावरून चालत असताना डाव्या बाजूने चालण्याचा नियम होता परंतु आता मॉर्निंग वॉक किंवा रस्त्यावरून चालत असताना उजव्या बाजूने चालावे याकरिता वॉकेथॉन च्या माध्यमातून जनजागृती व्हावी याकरिता रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आज शहरातून जयस्तंभ चौक मार्गे कारंजा चौक जिल्हाधिकारी कार्यालय येथून मार्ग क्रमण करत जनजागृती करण्यात आली या रॅलीचा समारोप जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथे करण्यात आला या रॅलीत आरटीओ ऑफिस चे अधिकारी कर्मचारी तथा विविध शाळा विद्यालयातील एनसीसी चे विद्यार्थी स्काऊट गाईड तथा भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने या वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले होते.