जिल्हाधिकारी यांना ए आय एम आय एम पक्ष व मुस्लिम बांधवांच्या वतीने निवेदन….
मुस्लिम महिलांना आमिष दाखवून पाठवले,
‘धन्यवाद मोदीजी पत्र’..
धन्यवाद मोदीजी म्हणत काल दिनांक 6 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत असंख्य मुस्लिम महिलांनी मोदीजींना पत्र पाठवले
यावरून एम आय एम चे जिल्हाध्यक्ष डॉ मोबीन खान व मुस्लिम समाजाचे काही नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक 6 मार्च रोजी भाजपा आमदार श्वेता महाले व पदाधिकाऱ्यांच्या वतीने असंख्य मुस्लिम महिलांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलावले, आणि
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम महिलांवर अत्याचार व अन्यायकारक असणाऱ्या तीन तलाक कायद्यात हस्तक्षेप करून त्यावर कायद्याने बंदी घातली यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद मानणारे पत्र जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मोदींजीना पाठवले.. तसेच
अकरा वाजेपासून या मुस्लिम महिलांना खोटे आमिष देऊन तुम्हाला कामगारांचे सुरक्षा संच, संसार किट, कामगार विभागामार्फत मिळणाऱ्या विविध योजना भांडे,धन्यचे किट दिले जाणार, असे खोटे आमिष देऊन बोलावले असल्याचा आरोप ए आया एमआय एम पक्ष व मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आला असून भाजपा पदाधिकारी व आमदार श्वेता महाले यांच्यावर कारवाई करण्यात यावी , अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली.. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठवण्यात आलेलं धन्यवाद मोदीजी हे पत्र थांबवण्यात यावे , अशी मागणी देखील मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे… निवेदन देतेवेळी
डॉ. मोबीन खान, जिल्हा अध्यक्ष,मोहम्मतद सिफात, जिला सचिव,अकील अहेमद, शहर अध्यक्ष,मोहम्मद जहीर शहर सचिव ,शेख साबिर शहर उपाध्यक्ष ,मुकद्दर शाह शहर महासचिव ,अली भाई योगेश पांडव,जावेद कुरेशी सामाजिक कार्यकर्ते ,अमीन ट्रेलर व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते