बातमी

*जात चोरून जो आमदार झाला तो आता नको.!*खरा एससी मधील आमदार आता हवा..* *भाई दीपक केदारे*

आमचा अलायन्स महाविकास आघाडी सोबत महाराष्ट्रातील 5 विधानसभेची मागणी…

 

जात चोरून जो आमदार झाला तो आता नको…. खरा एससी मधील आमदार आता हवा.. भाई दीपक केदारे

 

बुलढाणा जिल्ह्यातील दौऱ्यावर असलेले ऑल इंडिया पँथर सेनेचे संस्थापक भाई दीपक केदारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील पाच विधानसभेच्या जागा लढवणार असून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा ती स्वतः लढवणार असल्याची माहिती दिली.
लोकसभेमध्ये ऑल इंडिया पँथर सेनेने महाविकास आघाडीला विविध लोकसभा मतदारसंघात पाठिंबा जाहीर केला होता.
महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाकडून आपण महाराष्ट्रातील या 5  जागा मागणार असून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभेत विद्यमान आमदार यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर ऑल इंडिया पॅंथर सेनेने त्या ठिकाणी मोर्चा काढून या अत्याचाराविरोधात रणशिंग फुंकले होते. त्यामुळे मेहकर विधानसभेत पक्षाचे संघटन मजबूत आहे. मतदार संघात तिल दलित, मुस्लिम बहुजनांना आता एका नव्या चेहऱ्याची गरज आहे. जात चोरून जो आमदार झाले आहे तो आता नको आणि खरा एससी मधील आमदार आता हवा आहे.! असे म्हणत मेहकर विधानसभा आपण लढवणार असल्याची माहिती ऑल इंडिया पॅंथर सेनेचे संस्थापक भाई दीपक केदारे यांनी माहिती दिली यावेळी युवा अध्यक्ष आकाश हिवाळे तालुकाध्यक्ष किशोर सरकटे तालुका संपर्कप्रमुख फारुक शेख ,सोनू निकाळजे
तालुका सचिव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button